शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

Vidhan Parishad Election 2018 Live: मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीच्या कपिल पाटील यांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 8:20 AM

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई- मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठी आघाडी घेत विजय मिळवास तर  मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस हे विजयी झाले आहेत.  

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरू आहे. नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.   

कोकण पदवीधरमधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी मतमोजणी सुस्थितीत व वेगाने होण्यासाठी 28 टेबल्स मांडण्यात आले आहेत. 78 सदस्यीय विधान परिषदेत सात मतदारसंघ हे पदवीधर तर सात मतदारसंघ हे शिक्षकांसाठी राखीव असतात. एकूण 14 आमदार हे पदवीधर व शिक्षकांमधून निवडून येतात. 30 आमदार हे विधानसभेतून निवडले जात असून, इतर 22 सदस्य हे स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतात.याशिवाय या वेळेस काही सूक्ष्म निरीक्षकदेखील मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहेत. पसंतीक्रम पद्धतीचे मतदान असल्याने उमेदवाराला विजयी होण्यासाठी विशिष्ट फॉर्म्युलाद्वारे आवश्यक कोटा निश्चित करण्यात येतो त्यानुसार सर्व उमेदवारांना मिळालेली मते मोजली जातात. मुंबई शिक्षक मतदारसंघात 8 हजार 353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.12 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37 हजार 237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75 हजार 439 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 72.35 आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात 49 हजार 742 एवढे मतदान झाले असून, त्याची 92.30 टक्केवारी आहे.मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र शाळांमधून शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षक परिषदेकडे आल्या आहेत. म्हणून 25 जून रोजीची ‘विशेष सुट्टी’ असल्याने शिक्षकांची रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे बुधवारी केली आहे. मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात 'टफ फाइट' होऊ शकते.

  • 'कोकण पदवीधर'मध्ये काँटे की टक्कर

निरंजन डावखरे - भाजपा संजय मोरे - शिवसेनानजिब मुल्ला  - राष्ट्रवादी 

  • 'मुंबई पदवीधर'मध्ये महामुकाबला   

विलास पोतनीस - शिवसेनाराजू बंडगर - स्वाभिमान पक्ष पुरस्कृत उमेदवारराजेंद्र कोरडे - शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)जालिंदर सरोदे - शिक्षक भारतीदीपक पवार - अपक्ष

  • मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढाई

कपिल पाटील - शिक्षक भारती (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)शिवाजी शेंडगे - शिवसेनाअनिल देशमुख - भाजपा 

  • 'नाशिक शिक्षक'मध्ये घराणेशाही 

किशोर दराडे - शिवसेना (विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडेंचे भाऊ)अनिकेत पाटील - भाजपा (माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव)संदीप बेडसे - महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी  

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishad Election 2018विधान परिषद निवडणूक 2018Electionनिवडणूक