शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

‘बविआ’च्या मतांसाठी मनधरणी; भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:42 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत बविआचे हितेंद्र ठाकूर कुणाच्या पारड्यात आपली मते टाकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

वसई: राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही अपक्षांवर मदार असून, छोट्या पक्षांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने सरशी केली असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, या पराभवाची परतफेड करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. त्याच अनुषंगाने बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. बविआकडे तीन आमदार असून निर्णायक त्यांची मते ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. 

बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हितेंद्र ठाकूर यांची भेट घेणार आहेत. यांच्यासह भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. तर अपक्ष आणि लहान पक्षांनी कोणाच्या पारड्यात मतदान केले याचे आखाडे अजूनही बांधले जात आहेत. त्यातच विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पाडली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. विधानसभेतील लहान पक्ष आणि अपक्षांना वळवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. यातच बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकHitendra Thakurहितेंद्र ठाकूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस