Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:32 IST2022-06-08T15:24:51+5:302022-06-08T15:32:09+5:30
Vidhan Parishad Election 2022: 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी
मुंबई: राज्यसभेनंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर आता काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन सकपाळ, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सोनिया गांधी यांनी या दोन नावांवर सहमती दर्शवल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस मुकील वासनिक यांनी दिली आहे.
संबंधित बातमी- विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट
भाजपची यादी जाहीर
भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाही.