शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election 2018: भाजपाला आणखी 'अच्छे दिन'; विधानसभेतील 'मोठा भाऊ' आता विधानपरिषदेतही होणार 'मोठा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 18:32 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने आता विधान परिषदेतही मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने आता विधान परिषदेतही मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या महिन्याअखेरीस रिक्त होत असलेल्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ पाचने वाढून भाजपा हा वरच्या सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या 11 सभासदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दोन आणि शिवसेना व शेकापचा प्रत्येकी एक सदस्य आहे. रिक्त झालेले सभासद विधानसभा सदस्यांकडून निवडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे पाच आणि शिवसेनेचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या तडजोडीनुसार काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. तर अन्य पक्षांनी अतिरिक्त उमेदवार न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य जयंत पाटील हे सुद्धा आपली जागा राखू शकतील.  सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, काँग्रेसचे 18, भाजपाचे 20 आणि शिवसेनेचे 11, शेकाप, जदयू, पीआरपी यांचे प्रत्येकी एक आणि सहा अपक्ष सदस्य आहेत. मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर हे चित्र बदलणार असून, भाजपा अव्वलस्थानावर जाईल. दरम्यान निवडणूक प्रकिया आटोपून भाजपा अव्वल स्थानी पोहोचल्यावर भाजपाकडून सभापतीपदासाठी प्रयत्न केले जातील, असे भाजपाच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.  

टॅग्स :Vidhan Parishad Election 2018विधान परिषद निवडणूक 2018PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषदvidhan sabhaविधानसभा