शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:54 IST

Santosh Deshmukh Viral Videos Photos: संतोष देशमुखांना प्रचंड यातना देऊन संपवण्यात आले. ज्यावेळी मारहाण सुरू होती, त्यावेळी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कॉल करण्यात आला होता. फोटो आणि व्हिडीओही टाकण्यात आले होते. 

Santosh Deshmukh Video and Photos: ९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या शिवारात सापडला. या तीन तासांत संतोष देशमुख यांना नरकयातना दिल्या गेल्या. आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुखांना हालहाल करुन मारले याचे फोटोच समोर आले आणि महाराष्ट्राचं मन हळहळले! संतोष देशमुखांना संपवत असताना आरोपींनी ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कॉल केले आणि व्हिडीओ पोस्ट केले. त्याचं नावही समोर आलंय. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीच्या पथकाने १५०० पानांचे आरोपपत्र केजच्या न्यायालयात सादर केले. तपासात सीआयडीला काय काय सापडले, याबद्दल दररोज नवी माहिती समोर येत आहे. सोमवारी (३ मार्च) संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने संपवण्यात आले, याचे फोटो आरोपपत्रातील फोटो पुढे आले. 

त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे नाव काय?

संतोष देशमुखांना मारहाण केल्याचे जे व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत, ते एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्यात आले. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे नाव मोक्कारपंथी असे आहे. कृष्णा आंधळे याने आधी संतोष देशमुखांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर याच मोक्कारपंथी ग्रुपवर एक व्हिडीओ कॉलही करण्यात आला होता. 

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना केलेल्या व्हिडीओ कॉलवर वाल्मीक कराड होता. त्याने हे बघितले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपरून केलेला कॉल आणि फोटो आणि व्हिडीओ सीआयडीने पुरावा म्हणून जप्त केले आहेत. 

'सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे म्हण'

सीआयडीने जप्त केलेल्या चौथ्या व्हिडीओमध्ये 'सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असे म्हण', असे आरोपी संतोष देशमुखांना म्हणायला लावत आहेत. 

पाचव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, संतोष देशमुखांना फक्त उघडे करून बसवण्यात आले आणि त्यांच्या पाठीवर पाईपने अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडViral Videoव्हायरल व्हिडिओViral Photosव्हायरल फोटोज्Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या