Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 08:57 IST2025-09-23T08:55:44+5:302025-09-23T08:57:36+5:30

Omraje Nimbalkar Video: मराठवाड्याला परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराचा वेडा पडला आहे. परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये आजी दोन वर्षाच्या नातवासह पुरात अडकली होती. 

Video: Two-year-old grandson and grandmother trapped in flood, MP Omraje Nimbalkar enters water to save them | Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात

Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात

Omraje Nimbalkar News: दोन वर्षांचा नातू आणि आजी पुरात अडकले होते. त्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रशासनाला मिळाली. दोघांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. खासदार निंबाळकरही घटनास्थळी आले. परिस्थिती बघून एनडीआरएफच्या जवानांसह खासदार ओमराजे निंबाळकरही पुरात उतरले आणि दोन वर्षांच्या नातवासह आजीला बाहेर काढण्यासाठी मदत केली. 

परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुडगूस घातला आहे. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसला असून, काही तालुक्यात पूरपरिस्थितीनिर्माण झाली आहे.  धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात असलेल्या वडनेरमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवली.

एकाच कुटुंबातील एक आजी आणि दोन वर्षांचा नातू आणि इतर दो कुटुंबातील सदस्य पुराच्या पाण्यात अडकले. घराला पाण्याने वेढा दिल्याने चौघेही रविवारी मध्यरात्रीपासून घरच्या छतावर जाऊन बसले होते. 

अन्न-पाण्याविना काढली रात्र

कुटुंबातील चारही व्यक्ती रविवारी मध्यरात्री २ वाजेपासून छतावर बसून होते. त्यांना ना अन्न मिळाले ना पाणी. मदतीच्या प्रतिक्षेत आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या चौघांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. 

पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग आणि पावसातच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या पथकाबरोबरच खासदार ओमराजे निंबाळकरही पाण्यात उतरले आणि कुटुंबातील चौघांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. 

या रेस्क्यू ऑपरेशनबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, 'वडनेर (ता.परंडा) येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते.'

'एनडीआरएफच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले. या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन', असे ओमराजे निंबाळकर म्हणाले. 

Web Title: Video: Two-year-old grandson and grandmother trapped in flood, MP Omraje Nimbalkar enters water to save them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.