शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पत्रपेट्यांना लागले ग्रहण !

By admin | Updated: October 9, 2016 20:54 IST

पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा.

राम देशपांडे/ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 9 - पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ई-मेल, एसएमएस, फेसबुक, व्हॉट्स अँपद्वारे क्षणात संदेश पोहोचविता येत आहेत. त्यामुळे एकेकाळी संपर्काचे माध्यम म्हणून मदतीला येणार्‍या पोस्टाच्या पत्रपेट्या जीर्णावस्थेकडे वाटचाल करीत असून, कालबाह्य होत असल्याचे दिसत आहे. डाक विभागाने शहरात उभारलेल्या पत्रपेट्यांपैकी, अनेक पत्रपेट्या काळाच्या ओघात जीर्ण होऊन नष्ट झाल्या आहेत. रंगरंगोटी करून अनेक पत्रपेट्यांचे रूप पालटले असले, तरी त्यांचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे. खदान परिसरातील शासकीय गोदामासमोरील पत्रपेटीचा लाल रंग शाबूत आहे; मात्र परिसरातील काही टपोरी पोरांनी तिचे कुलूप तोडले असून, त्यात दगड, मेनकापडाच्या पिशव्या व कचरा जमा झाला आहे. रात्रीच्या वेळी या पत्रपेटीच्या साक्षीने मद्याचे घोटदेखील रिचविले जात असल्याचे अवशेष तिच्या अवतीभोवती दिसून येतात. विश्‍वासार्हता लोप पावल्यामुळे पत्रपेटीचा वापर करण्यास नागरिक टाळाटाळ करतात. शहरातील अनेक पत्रपेट्यांची विश्‍वासार्हता अशा पद्धतीने लोप पावली असल्याने, अनेक गरजू नागरिक थेट डाकघर गाठत असल्याचे दिसून येते. एक काळ होता, जेव्हा दूरदर्शन आणि काही खासगी दूरचित्रवाहिन्यांवर काही नावाजलेल्या कार्यक्रमांनी टपाल खात्याला सुवर्णकाळ दाखविला. धडाक्याने होत असलेल्या पोस्ट कार्डांच्या विक्रीमुळे टपाल खात्याला चक्क निळय़ा रंगाची स्पर्धात्मक पोस्ट कार्डांची निर्मिती करावी लागली होती; मात्र आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट मोबाइलचे तंत्रज्ञान आले असल्याने, चॅटिंग, मॅसेजिंग, ई-मेल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माहितीची देवाण-घेवाण त्वरित होऊ लागली आहे. त्यामुळे संदेशवहनाच्या प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पत्रपेट्यांना ग्रहण लागले असून, डाक विभागाचे अधिकारीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

--------------------------शहरातील पत्रपेट्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दोन हजारच्या दशकात पत्रपेट्यांमधून डाक जमा करण्यासाठी मोठे पोते बाळगावे लागायचे. बोटावर मोजण्याइतक्या पत्रपेट्याच सुस्थितीत असल्याने आता डाक आणण्यासाठी एक लहानशी पिशवी पुरेशी ठरते. - एस. एम. टिपरकारपोस्टमन, अकोला.