VIDEO : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या धनश्रीचे नेत्रदीपक यश

By Admin | Published: June 13, 2017 08:47 PM2017-06-13T20:47:15+5:302017-06-13T20:47:15+5:30

आॅनलाईन लोकमत/विजय शिंदे अकोट(जि.अकोला), दि. 13 - आकोट येथील धनश्री अशोक हागे या दोन्ही डोळ्यानी अंध असलेल्या मुलीने दहावीच्या ...

VIDEO: The magnificent achievement of Dhanashree, who is blind with both eyes | VIDEO : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या धनश्रीचे नेत्रदीपक यश

VIDEO : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या धनश्रीचे नेत्रदीपक यश

googlenewsNext
आॅनलाईन लोकमत/विजय शिंदे
अकोट(जि.अकोला), दि. 13 - आकोट येथील धनश्री अशोक हागे या दोन्ही डोळ्यानी अंध असलेल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण घेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. तिचे हे यश डोळस विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायी ठरणारे आहे.
अंध विद्यालयात व ब्रेल लिपीचा वापर न करता तिने सर्वसामान्य डोळस विद्यार्थ्यांसारखा अभ्यास करीत यश मिळविले. जिद्द व आत्मविश्वास जागृत करीत दहावी अभ्यासक्रमाच्या रेकॉर्डेड सीडी ऐकत भाषांतर करून आई सोनल व वडील अशोक यांनी अभ्यास करून घेतला. परीक्षा करीता नववीची विद्यार्थिनीला रायटर घेऊन तिने परिक्षा दिली. या परीक्षेत 500 पैंकी 474 गुण मिळाले. समाजशास्त्र विषया मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. ती अकरावीत कला शाखेत प्रवेश  घेणार आहे. जिद्द व संघर्ष करीत  युपीएस ची परिक्षा देत  जिल्हाधिकारी व्हायचे  स्वप्न धनश्रीचे आहे.


 
https://www.dailymotion.com/video/x8453ng

Web Title: VIDEO: The magnificent achievement of Dhanashree, who is blind with both eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.