शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अकोल्यात झाला लोककलांचा वैभवशाली जागर

By admin | Updated: September 14, 2016 15:55 IST

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये याच लोककलांच्या वैभवशाली आणि समृद्ध वारशाचा 'जागर' करण्यात आला

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 14 -  'वाघ्या-मुरळी', 'भारूड', 'भराडी', 'वासुदेव', 'खाप-या', 'कोरकू नृत्य', 'झेंडवाई', 'गोंधळ', 'ठावा', 'जात्यावरचे गाणे'..... ही सर्व नावं आपल्या या पिढीला कदाचित माहिती नसतील पण या नावांनी ओळखल्या जाणा-या लोककलांनीच महाराष्ट्राचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. काळाच्या ओघात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध करणा-या या लोककलांचा वारसा दिवसेंदिवेस लोप पावत आहे. या कला पुढच्या पिढीमध्ये प्रवाहित करण्यासाठी आता कलावंतच समोर आले असून  अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये  याच लोककलांच्या वैभवशाली आणि समृद्ध वारशाचा 'जागर' करण्यात आला. 
 
महाराष्ट्रातील विविध लोककलांच्या 'जागर लोककलांचा' या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात वाघ्या-मुरळी', 'भारूड', 'भराडी', 'वासुदेव', 'खापºया', 'कोरकू नृत्य', 'झेंडवाई' अशा एक ना अनेक कलाप्रकारांनी अकोटकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडलेय... अकोट जेसीआय या संस्थेने हे आयोजन केलं होते अकोट येथील जे.सी.आय.' अर्थातच 'जुनिअर चेम्बर्स इंटरनेशनल; ही संस्था दरवर्षीच्या आगळ्या-वेगळ्या अन 'हटके' 'फैशन शो' चे आयोजन करते. याआधी या संस्थेने अकोट येथे गाय, बैल, कुत्रा, ऑटो, बैल-गाडी अशा कृषी संस्कृतीशी  नाते सांगणाºया घटकांचे 'फैशन शो' आयोजित केले होते. यावर्षी मात्र लोककलांचा जागर करून यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वालाच वंदन केले आहे.