शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO-अकोल्यात साकारतेय 11 लाखांच्या नोटांची गणेशमूर्ती !

By admin | Updated: September 5, 2016 06:36 IST

करकरीत नोटांपासून अकोल्यात अभिनव श्रीमूर्ती साकारली जात असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते.

संजय खांडेकर / ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 5 - अकरा लाख रुपयांच्या करकरीत नोटांपासून अकोल्यात अभिनव श्रीमूर्ती साकारली जात असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. गवळीपुरा मनकर्णा प्लॉटमधील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमात शहारातील अनेक उद्योजकांनी आर्थिक हातभार लावला आहे. दिव्यांग राजेश ऊर्फ टिल्लू टावरी या कलावंत युवकाच्या कल्पनेतून ही नोटांची मूर्ती साकारत आहे. दहा रुपयांपासून तर एक हजार रुपयाच्या नोटेचा यामध्ये उपयोग समावेश असून मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी स्ट्राँग रूम आणि आठ सीसी कॅमेरे नजर ठेवणार आहेत.मनकर्णा प्लॉटमधील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ गत ४८ वर्षांपासून श्रीमूर्तीची स्थापना करीत आहे. त्यातही गेल्या ३८ वर्षांपासून इको फ्रेंडली मूर्ती स्थापन करण्याचा आदर्श या मंडळाने निर्माण केला आहे. यावर्षी साकारत असलेली नोटांची मूर्ती लोखंडी चौकटीवर बनविली जात आहे. मूर्ती विसर्जनाच्या वेळी केवळ प्रतिष्ठापनेची मानाची लहान मूर्ती शिरवली जाते. यंदा या मंडळाने विविधरंगी नोटांच्या छटांतून आकर्षक रेखीव प्रतिमा साकारण्याचा प्रयोग केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत अकरा लाख रुपयांच्या नोटांच्या मूर्तीचे काम सुरुच होते. सोमवारी सायंकाळी प्रतिष्ठापनेच्या वेळेपर्यंत मूर्ती पूर्णरूपास येणार असल्याची माहिती राजेश टावरी यांनी दिली. या उपक्रमास राजेश शर्मा, विजय चौरसिया, अमुल देशपांडे, शेख इमाम हसन, डॉ. सरोज माहेश्वरी, भरत पवार, कल्पेश सावय्या यांचे सहकार्य लाभले आहे. सामाजिक एकोप्याचे प्रतीकसामाजिक एकतेच्या उद्देशाने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात वीर भगतसिंग मंडळ शंभर टक्के कार्य करीत आहे. या मंडळात दोन मुस्लीम सदस्यदेखील सहभागी असतात. गेल्या दहा वर्षांपासून गवळीपुऱ्यातील शेख इमाम शेख हसन आणि बुडन गाडेकर या मुस्लीम युवकांचा समावेश आहे.मुद्रांच्या इतिहासाचे राहील आकर्षणमुद्रा केव्हा कधी अस्तित्वात आल्यात, कोणत्या काळात कोणते चलन कोणत्या राजाने आणले, याची सविस्तर माहिती या मंडळाच्यावतीने गणेशभक्तांसाठी दिली जाणार आहे. मुद्रांचा अवमान होऊ नये, याची संपूर्ण काळजी घेतली असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.