शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - विहिरीत पडलेल्या बिबटाला मिळाले जीवदान

By admin | Updated: August 18, 2016 17:27 IST

बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले

- राम देशपांडे अकोला, दि. 18 : बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड गावालगतच्या नाल्याकाठी असलेल्या शेतशिवारातील विहिरीत मध्यरात्री बिबट पडले. धारदार दातांच्या आधारे विहिरीतील लोखंडी सळी पकडून असलेल्या या बिबटाला सकाळी ९.१५ च्या सुमारास बाहेर काढण्यात वनविभागाचे अधिकारी व बचाव पथकातील सहकार्‍यांना यश आले.

बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोळी वरखेड हे गाव काटेपूर्णा अभयारण्याच्या सीमेवर आहे. गावालतच्या नाल्याकाठी सरपंच आधंळे यांच्या शेतातील विहिरीत बुधवार व गुरूवारच्या मध्यरात्री बिबट पडले असल्याची माहिती गावातील लोकांना कळली. पहाटे ६ च्या सुमारास सरपंच आंधळे यांनी ही बाब वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. माहिती मिळताच वपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. विहिरीला संरक्षित भिंत वा कुठलेही आवरण नसल्याने, विहिरीत पडलेले २.५ ते ३ वर्षांचे हे बिबट आपल्या धारदार दातांच्या आधारे लोखंडी सळी पकडून होते.

बार्शिटाकळीचे वनपाल शेख हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. वन अधिकार्‍यांच्या नेतृत्वात बचाव पथकातील वनरक्षक सुनील राऊत, निलेश सोनोने, सिद्धार्थ जोंधळे, सर्पमित्र मुन्ना उर्फ शे. मोहम्मद व अनील चौधरी यांनी चोहू बाजूने दोर बांधलेली खाट विहिरीत सोडली. महतप्रयासानंतर ९.१५ च्या सुमारास खाटेच्या आधारे विहिरीतून बाहेर पडलेल्या बिबटाने अभयारण्याच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थणी ग्रमस्थांनी गर्दी केली होती. विहिरीत पडलेले बिबट पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी वनविभागाच्या चमूला वेगळे परिश्रम घ्यावे लागले. काटेपूर्णा आणि मेळघाट अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधील बहुतांश विहिरींना संरक्ष भिंती नसल्याने जंगलातील श्‍वापदे त्यात पडत असून, या विहिरीच जंगलातील राजाची शिकार करीत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने जागतिक व्याघ्र दिनी प्रकाशित केले होते. त्यानंतरही शेतकरी व वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जंगली श्‍वापदे त्यात पडत असल्याचे हे ताजे उदारहण म्हणावे लागेल.----अभयारण्यालगतच्या शेतशिवारांमधी बहुतांश विहिरींना संरक्षित भिंती नाहीत. त्यावर आवरण देखील टाकले जात नाही. परिणामी, तहान व भूक भागविण्यासाठी लगतच्या शेतशिवारांमध्ये फिरणार्‍या जंगलातील श्‍वापदांना जीव गमवावा लागतो. शेतकर्‍यांनी अशा विहिरींना संरक्षित कठडे व आवारण घालावेत.- अशोक वायाळवनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा