शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बीड - जिल्हा रुग्णालयात सीएस विरुद्ध कर्मचारी!

By admin | Updated: August 23, 2016 18:10 IST

रात्र पाळीवर असलेले कर्मचारी झोपल्याचे पाहून शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मंगळवारी पहाटे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद करत एल्गार पुकारला.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. : रात्र पाळीवर असलेले कर्मचारी झोपल्याचे पाहून शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मंगळवारी पहाटे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद करत एल्गार पुकारला. दरम्यान, मी संबंधित कर्मचाऱ्याला केवळ कर्तव्यकाळात झोपू नकोस एवढेच सांगितले. मारहाण केली नसल्याचा खुलासाही शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी पत्रकार परिषद घेवून केला आहे.वर्षभरापूर्वी जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून शंकर मैंड नवाच्या एका कर्मचाऱ्याने विष प्राशन केले होते. या घटनेनंतर आता रात्र पाळीवर सात नंबर वॉर्डमध्ये ड्यूटी करत असलेला कर्मचारी तुकाराम सुर्यभान जगताप, भाऊसाहेब विक्रम बागलाने या दोघांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मारहान केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला आहे. कर्मचारी झोपले असतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करायची, कर्मचाऱ्यांना लाथा बुक्यांनी मारहान करण्याचा डॉ. बोल्डे यांना कोणी अधिकार दिला, असे म्हणत जिल्हा रूग्णालयातील परिचारिका व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी यांनी रूग्णालयांसमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

यावेळी आरोग्य उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्रपाळीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना माझ्या कॅबीन मध्ये या असे म्हणून अपमानीत करतात असा आरोप यावेळी रूग्णालय महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य परिचारिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष शिला मुंडे, राज्य संघटक सहसचिव राजेंद्र औसरमल, जिल्हा अध्यक्षा आ. सी. दिंडकर, जिल्हा सचिव मंदाकीनी खैरमोडे, ज्योती उबाळे, जयश्री डोरले यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी अंदोलनात सहभाग नोंदवला. कारवाई करण्याचे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान रूग्णांची हेळसांड झाल्याचे चित्र रूग्णालयात पहावयास मिळाले.आंदोलनाच्या दरम्यानच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी पहाटे मी जेव्हा जिल्हा रग्णालयात राऊंडला आलो तेव्हा सात नंबर वॉर्ड मधील कर्मचारी झोपले असल्याचे पाहिले. झोपलेल्या  कर्मचाऱ्यांना उठवून मी झोपू नका एवढेच बोललो आहे. मी कोणालाही हानमार केली नाही. झोपलेले आढळलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्साठी मी त्यांना माझ्या कॅबीनला येऊन भेटा असे सांगितले. कारण यापुढे ड्यूटी सुरू असताना झोपू नये याबाबत मला त्यांना सूचना द्यायच्या होत्या, असे डॉ. बोल्डे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.