शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:45 IST

या २ मुलींनी निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या दोघींचे प्राण वाचले.

पुणे - पोलीस यंत्रणेला हाताशी धरायचे, जो कुणी आपलं ऐकत नाही त्यांना पाहिजे त्या पद्धतीने दाबत राहायचे अशी त्यांची मोडस ऑपरेंडी आहे असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत अंधारे यांनी निंबाळकरांवर अनेक धक्कादायक आरोप करत २ सख्ख्या बहि‍णींना माध्यमांसमोर आणले.

या २ मुलींनी निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या दोघींचे प्राण वाचले. मात्र इतकेच नाही तर या मुलींवर आणि त्यांच्या आईवर निंबाळकरांच्या दबावामुळे खंडणी, मकोकासारखे गुन्हे पोलिसांनी नोंदवली असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला. त्या फोटोतील उपचार घेणारी तरूणी आणि तिच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकट्या डॉ. संपदा मुंडे हिचा जीव गेला नाही तर तिच्यासारखे अनेक आहेत. दिंगबर आगवणे हे नाव फलटण मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे असं सांगत ज्या मुलींनी जीव देण्याचा प्रयत्न केला त्यामागचे कारण सांगण्यासाठी सुषमा अंधारे यांनी त्या २ बहि‍णींनाच पत्रकार परिषदेसमोर आणले. 

कोण आहे वैशाली आगवणे?

वैशाली आगवणे या दिंगबर आगवणे यांच्या कन्या आहेत. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी वडिलांना अटक झाली. त्यानंतर ९ नोव्हेंबरला घरावर जप्ती झाली, त्याआधी ८ नोव्हेंबरला आम्ही औषध घेतले होते. जगदीश कदम हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी येऊन धमकी दिली होती. आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचाही कार्यक्रम लावू असं म्हटले. जी माणसं वडील असताना घराचा उंबरठा ओलांडत नव्हती तीच माणसे घरात आणि किचनपर्यंत वावरत होती. आम्हाला खूप भीती वाटत होती. या भीतीपोटी आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी यांना फोनही केला होता. वहिनीसाहेब आम्हाला खूप भीती वाटतेय, हे कुठेतरी थांबवा असं म्हटलं. परंतु यात मी काहीच करू शकत नाही असं उत्तर त्यांनी दिले. आज जी परिस्थिती संपदा मुंडे यांची होती, त्यांचा मानसिक छळ केला होता, त्या खूप घाबरल्या होत्या. तशीच मनस्थिती आमची होती. वडिलांच्या अटकेनंतर २ दिवसांत आईवरही गुन्हा दाखल झाला, ती तिथे नव्हती त्यामुळे आम्हाला पाठिंबा देणारे कोणच नव्हते. आम्ही दोघीच बहिणी घरी असायचो, त्यामुळे आमच्यावरही कुणी हात टाकेल अशी भीती वाटत होती त्यामुळे काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वत:चा जीव संपवण्यासाठी आम्ही औषध घेतले असं वैशाली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, दिगंबर आगवणे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी होती. दिगंबर आगवणे यांना न सांगता रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यांच्या अनेक मालमत्ता बँकेकडे तारण ठेवल्या. त्यानंतर दिगंबर आगवणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. एकाच माणसांवर २४ गुन्हे दाखल करण्यात आले. दिगंबर आगवणे यांच्या कुटुंबातील महिलांवर मकोकासारखे गुन्हे दाखल केले असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. या पत्रकार परिषदेत दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यादेखील होत्या. त्यांनी जो त्रास संपदा मुंडे यांना झाला त्या त्रासातून आम्ही मागील २ वर्षापासून जात आहोत. कुणीही आमची दखल घेत नाही. आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या परंतु त्याच्याही बातम्या दाबण्याचं काम करण्यात आले. सत्तेचा गैरवापर करून आमच्या कुटुंबाचा छळ करत विविध गुन्हे दाखल केले आहेत असं त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-MP Accused of Harassment; Sisters Attempted Suicide Due to Pressure

Web Summary : Sushma Andhare accuses ex-MP Ranjitsinh Naik Nimbalkar of harassment, leading two sisters to attempt suicide. The family faces false charges, including MCOCA. Victims claim Nimbalkar misused power, seizing assets and filing multiple cases against them.
टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर