शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनची विदर्भ - मराठवाड्यापर्यंत जोरदार मुसंडी; मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 19:11 IST

मॉन्सून पुढील 48 तासांत उर्वरीत महाराष्ट व्यापणार

ठळक मुद्देगोवा, कोकणच्या किनारपट्टीवर जोरदार वारे व मुसळधार पाऊस मॉन्सुनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल हवामान

पुणे : मॉन्सूनने आगेकुच सुरु ठेवली असून त्याने आता विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत मुसंडी मारली आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात मुसळ्धार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश, मेघालय, कर्नाटक याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.शुक्रवारी सायंकाळी सुटलेल्या थंडगार हवेमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पावसाने पुणेकरांना हुलकावणी दिल्याचे दिसून आले.

गुरुवारी मॉन्सुन महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागांत पाऊस झाला. मॉन्सुनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल हवामान असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. आंध्रप्रदेश, ओडिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे येत्या 24 तासांत गोवा, कोकणच्या किनारपट्टीवर जोरदार वारे व मुसळधार पाऊस पडेल. त्याचा प्रभाव पुढे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा याठिकाणी दिसून येईल.  मंगळवारी मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही ठिकाणी पुढे वाटचाल केली. बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर १४ अथवा १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात १२ किंवा १३ जून, मुंबईत १३ जूनपर्यंत मॉन्सून दाखलहोण्याची शक्यता आहे. कोकणात १२, १३ व १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १४ जूननंतर मॉन्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सूनच्या नव्यातारखांनुसार गोव्यात मॉन्सूनचे आगमन ५ जून रोजी आहे. यंदा त्याला महाराष्ट्रात थोडा उशीर झाला असून, संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून १५ जूनपर्यंत व्यापतो.मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर तो वेगाने वाटचाल करणार असून, १५जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. राज्यात १२जूनपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरु होण्याची शक्यता असून, पुणे जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समुद्रावरुन प्रवास करणाऱ्या नैॠत्य मॉन्सुनसाठी सध्याची परिस्थिती योग्य आहे. तो पुढील 48 तासांत उर्वरीत महाराष्ट व्यापणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा