शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लष्करात मुलींना खूप चांगल्या संधी - श्रुती श्रीखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:16 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे ही मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे कायम ठेवला आहे. या उज्ज्वल यशाबद्दल देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या पार्श्वभूमीवर तिने ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तिच्याशी साधलेला संवाद...

श्रुती श्रीखंडे म्हणाली, बंगळुरूला झालेल्या मुलाखतीनंतर मेरिटमध्ये येईन अशी अपेक्षा होती, मात्र देशात पहिली येईन असे मात्र वाटले नव्हते. त्यामुळे देशात पहिली आल्याचा निकाल समजल्यानंतर आम्हा सर्वांना आनंदाचा मोठा धक्का बसला.शाळेत असतानाच लष्करात जाण्याचा निर्णय घेतला होता. बारावीनंतर आयएलएस लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. समांतरपणे सीडीएस परीक्षेची तयारी करीत होते. सीडीएस परीक्षा आणि लॉ यांचा एकाच वेळेस अभ्यास करायचा असल्याने त्याचे एक वेळापत्रक निश्चित करून अभ्यास केला. दररोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या नोट्स काढून चालू घडामोडींचा अभ्यास केला. सीडीएसच्या अभ्यासासाठी मुख्यत: मूलभूत संकल्पना पक्क्या करण्यावर भर दिला. त्यासाठी एनसीआरटीची इयत्ता ६वी ते १०वी ची पुस्तके वाचून काढली.लॉच्या अभ्यासासाठी लेक्चरला नियमित उपस्थित राहात होते. त्याचबरोबर परीक्षेच्या एक महिना अगोदर त्याच्या अभ्यासासाठी वेळ दिला. मुख्यत: वेळेचे नियोजन त्यासाठी उपयोगी ठरले.लष्करात जाणे पक्के असताना बारावीनंतर लॉमधून पदवी मिळविण्याचा निर्णय घेतला. मला पॉलिसी मेकिंग, राज्यघटना यांची विशेष आवड आहे. सीडीएसच्या परीक्षेत राज्यघटनेवर अनेक प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर लष्करात जॅक म्हणून एक एंट्री असते. त्यामध्ये मिलिटरी लॉयर म्हणून तुमची निवड होते. त्यामुळे कायद्याची पदवीधर होण्याचा निर्णय घेतला.देशातील इतर कोणत्याही सर्व्हिसेसमधील मुलाखतींपेक्षा सीडीएससाठी घेतली जाणारी मुलाखत अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. मुळात मुलाखत ही अनपेक्षित असते. लेखी परीक्षेतील संभाव्य प्रश्न माहीत असतात, मुलाखतीचे मात्र तसे नसते. सीडीएसची मुलाखत ही ५ दिवस चालणारी प्रक्रिया होती. आम्हाला बंगळुरूमध्ये मुलाखतीला बोलावले होते. मुलाखतीच्या या ५ दिवसांमध्ये विविध पद्धतीने तुम्हाला जोखले जाते. तुमच्यामध्ये अधिकारीपदाची गुणवत्ता आहे का हे मुख्यत: याद्वारे तपासले जाते.लष्करी अधिकाºयाचे व्यक्तिमत्त्व डायनामिक असते. त्यासाठी आवश्यक असणारे गुण मुलाखत देणाºया विद्यार्थ्यांमध्ये आहेत का, हे तपासले जाते. आमच्या मुलाखतीची सुरुवात सकाळी ६ वाजल्यापासून होत असे. त्यामध्ये मानसिक चाचणी, नेतृत्त्वगुण, सामाजिक दायित्व आदी अनेक गुणांची तपासणी केली जाते.एखाद्या कठीण परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाऊ शकाल याची चाचपणी केली जाते. या सर्व खडतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच तुमचा अधिकारी बनण्याचा मार्ग मोकळा होतो.घरी जरी लष्करी सेवेची परंपरा असली तरी डिफेन्समध्ये जाण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता. लष्कराच्या कॅम्पमध्ये राहताना तिथली शिस्त मी जवळून पाहिली होती. लष्कराच्या त्यावर्दीचे मला लहानपणापासूनच विशेष आकर्षण वाटत आले. त्यामुळे मी लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. घरी याबाबत सांगितल्यानंतर आई व वडिलांनी याला पूर्ण पाठिंबा दिला अन् मी परीक्षेची तयारी सुरू केली.डिफेन्सबरोबरच मी इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. मात्र माझे सर्वाधिक प्राधान्य लष्करातील सेवेलाच आहे. आयएएस, आयपीएस या पोस्ट निश्चितच सन्मानाच्या आहेत. मात्र लष्करी अधिकारी ही अत्यंत साहस व धैर्याची पोस्ट आहे. त्याद्वारे देशाचे रक्षण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या सेवेलाच माझे प्राधान्य राहील.मुली लष्करामध्ये चांगले कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांना माझे आवाहन आहे, की लष्करात जाण्याचे स्वप्न निश्चित बघा. तुम्हाला कुणी सांगेल, डिफेन्स हे महिलांसाठी नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. चांगला अभ्यास करा, व्यक्तिमत्त्व विकसित करा अन् परीक्षेत यश मिळवून चांगल्या लष्करी अधिकारी बना.

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड