शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 16:48 IST

VBA Prakash Ambedkar News: आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

VBA Prakash Ambedkar News: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढवली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडी, महायुती आणि तिसऱ्या आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी आरक्षणाला समर्थन दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी संविधानाला धरून नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. यातच आता आरक्षण संपवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल

ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींनाच राहिले पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये. ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर वेगळे आरक्षण द्यावे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल. आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर पडद्यामागे हालचाली सुरू असून, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

दरम्यान, आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल. रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचे धोरण आणणार आहे. या निवडणुकांमध्ये होणारे ध्रुवीकरण हे सामाजिक दृष्टिकोनातून होणार आहे. या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे. ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. ओबीसी फॅक्टर आरक्षण वाचले पाहिजे, याचे नेतृत्व करणार व मराठा आरक्षण विरोधी नेतृत्व करणार, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण