शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा; १८ रोजी वितरण

By admin | Updated: August 11, 2015 03:11 IST

हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृती कर्तबगार शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि जलसंधारण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील आठ शेतकरी

पुसद : हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृती कर्तबगार शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि जलसंधारण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील आठ शेतकरी आणि तीन कृषी शास्त्रज्ञांना १८ आॅगस्ट रोजी पुसद येथे आयोजित वसंतराव नाईक स्मृतिदिन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात दुपारी १२.१५ वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी कृषी व महसूलमंत्री एकनाथराव खडसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव राजकांती राहणार आहेत. या कार्यक्रमात एका एकरात सहा लाखांच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चिंबळी येथील सीमा चंद्रकांत जाधव, सहा एकरात केळी आणि स्ट्रॉबेरीचे १४ लाखांचे उत्पादन घेणारे पुणे जिल्ह्यातीलच केळवडे येथील संतोष पांडुरंग कोल्हे, आंबा कोकम प्रक्रिया आणि मसाले पिकापासून सहा एकरांत दहा लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील स्नेहा बाळकृष्ण बापट, भाजीपाला व फूल शेतीतून सात एकरांत आठ लाखांचे उत्पन्न घेणारे रायगड जिल्ह्यातील नागाव येथील प्रकाश शांताराम ठाकूर, आंबा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू रोपवाटिकेतून ७० लाखांचे निव्वळ उत्पन्न घेणारे जळगाव जिल्ह्यातील गारखेडा येथील रवींद्र माधवराव महाजन, केशर आंबा, सीताफळ, डाळिंब आदी फळबागांपासून २५ लाखांचे निव्वळ उत्पन्न घेणारे जालना जिल्ह्यातील नळविहिरा गावचे संजय दामोधर मोरे, एक एकर गुलाब शेतीतून व नऊ एकर केळीपासून १५ लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सवना येथील लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर आणि पाच एकरात तुरीची ठिबक सिंचनावर लागवड करून एकरी १३ क्ंिवटल उत्पादन घेणारे अकोला जिल्ह्यातील मघापुरी येथील सुधाकर बाणाईत यांचा गौरव करण्यात येणार आहे.वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी तूर उत्पादन वाढीचे प्रयोग व तुरीचे नवीन वाण यासाठी औरंगाबाद येथील डॉ. सूर्यकांत बापूराव पवार आणि बियाणे तंत्रज्ञानासाठी राहुरी येथील डॉ. विजय रामदास शेलार यांचा गौरव करण्यात येईल. तसेच वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कारासाठी विजयकुमार इंगळे, विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांची निवड करण्यात आली आहे. या नावांची घोषणा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार मनोहरराव नाईक, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांच्या मार्गदर्शनात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी केली. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर दुपारी ३.१५ ते ६ या वेळात पुरस्कारप्राप्त शेतकरी व शास्त्रज्ञांचे अनुभव कथन होईल. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी मंत्री अविनाश नाईक, स्वागताध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार यांनी केले. (प्रतिनिधी)