पुणे : आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता राज्यात सर्वदूर श्रावणासारख्या रिमझिम सरी बरसतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सध्या कोकण आणि विदर्भात मान्सून सक्रिय आहे़ शनिवारी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबईतही बहुतांश ठिकाणी दमदार सरी पडल्या. कोकणातील अलिबाग येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याशिवाय पुणे ३, कोल्हापूर ३, महाबळेश्वर २६, नाशिक ०़२, सांगली १, सोलापूर ०़५, मुंबई २९, अलिबाग ४०, रत्नागिरी १९, पणजी २९, डहाणू २५, उस्मानाबाद १४, औरंगाबाद १ मिमी पाऊस झाला.मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर ३०, गगनबावडा, हरसूल, ओझरखेडा, पारोळा, राधानगरी, शिरोळ २० मिमी पाऊस झाला़मराठवाड्यातील परभणी ८०, माहूर ५०, चाकूर, पूर्णा ४०, उदगिर ३०, बिल्लोली, जिंतूर, रेणापूर २० मिमी पाऊस झाला़ विदर्भात बल्लारपूर, चंद्रपूर, जोईती, महागाव, सावली, उमरखेड ४०, धानोरा, कळमेश्वर, सावनेर ३०, चामोर्शी, चिमूर, गडचिरोली, गोंदिया, कोरपना, मोहाडी फाटा, मूल, नागभिड, वाशिम २० मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी) >२०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस!राज्यात जुलैमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने मान्सूनचा जूनमधील बॅकलॉग भरुन निघाला आहे. ३५५ पैकी २०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १२५.४० लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून, पीक परिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु एकूण ३५५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यात २५ ते ५० तर ३४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.
आखाडातील रविवारवर वरुणराजाचीही कृपादृष्टी
By admin | Updated: July 31, 2016 03:52 IST