शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा भाजपचा विडा; संविधान सन्मान महासभेत ॲड. आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:01 IST

भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.

मुंबई - देशात एकीकडे जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. तर, दुसरीकडे प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. तसे झाल्यास त्यांना खुले मैदान मिळेल. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका आता वंचितांच्या खांद्यावर आली आहे. जे संविधानाला मानणारे राष्ट्रवादी, तर मनुवादाला मानणारे विघटकवादी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथील संविधान सन्मान महासभेत केली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर भाजपला मत देणार नाही हा निर्धार करा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा. देशात विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळेच भाजप नकली प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष मजबूत असता तर असली प्रश्नांना हात घालता आला असता. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताची ७ विमाने पाडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रम्प सांगतात, पण विरोधी पक्ष काहीच कसा विचारत नाही, असाही हल्लाबोल त्यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. इतर देशांतील भारतीयांच्या सभा घेतात. अमेरिकेने एच१ व्हिसा बंद केला. कारण बाहेरचे लोक वाढले तर राज्य करतील ही भीती त्यांना आहे. मोदींनी भारताला नुकसान पोहोचवले आहे, पण इतर देशांतील भारतीयांची त्या त्या देशातून हकालपट्टी करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे, असाही आरोप त्यांनी केला.  या देशातील प्रजा कशी असावी, हे ठरविण्याची वेळ मतदारांवर आली आहे. पैशांसाठी विकले जाऊ नका, असेही आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचितचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, युवा अध्यक्ष सुजात आंबेडकर, भारतीय बौद्ध समाजाचे एस. पी. भंडारी, जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी, विजयाबाई सूर्यवंशी (सोमनाथ सूर्यवंशी यांची आई), भन्ते राजज्योती (बुलडाणा), मौलाना डॉ. अब्दुर रशीद मदणी, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आरएसएस नोंदणी का करत नाही? सर्वच राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांना संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना जमाखर्च दिला जातो. मात्र, आमची संघटना ब्रिटिशांच्या काळातील आहे त्यामुळे नोंदणीचा प्रश्न येत नाही, हे आरएसएसचे उत्तर कायद्याचे पालन न करण्यासारखे आहे. याबाबत औरंगाबादला न्यायालयात खटला दाखल केला असून जोपर्यंत आरएसएसची नोंदणी होत नाही, तोपर्यंत टोकाचे भांडण सुरू राहील. ज्यावेळी नोंदणी होईल, त्यावेळी आमचे भांडण संपले, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Vow to Eliminate Regional, National Parties: Ambedkar's Criticism

Web Summary : Prakash Ambedkar criticizes BJP for dividing castes and aiming to eliminate regional and national parties. He urged people to not vote for BJP and accused Modi of harming India's interests, speaking at a Mumbai event.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी