शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:13 IST

Vaishnavi Hagawane Death Case And BJP Chitra Wagh : वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी संताप व्यक्त होत असताना आरोपीच्या वकिलाने मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. 

वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. “खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे व त्यांची बाजू मांडणारे. पुणे पोलीस एकेक पुरावा गोळा करा…. वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत यांचे जीव जाईस्तोवर…” असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

“पोरीला हालहाल करून मारून टाकलीत"

“खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे व त्यांची बाजू मांडणारे… पोरीला हालहाल करून मारून टाकलीत अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची... माणसं नाहीचं तुम्ही… पाईपाने मारमार मारलं… शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते.. हे असले युक्तीवाद करून काय साध्य करायचाय तुम्हाला…. पुणे पोलीस एकेक पुरावा गोळा करा…. वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत यांचे जीव जाईस्तोवर…” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

“वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू”

ॲड. विपुल दुशिंग यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेन्डन्सी सुसाइड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची पोलिस कोठडी एक दिवसाने, तर राजेंद्र आणि सुशील यांची पोलिस कोठडी ३१ मेपर्यंत वाढविली. फरार दीर, सासरा यांना आश्रय दिला म्हणून अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५) आणि राहुल दशरथ जाधव (४५, दोघेही रा. पुसेगाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे. 

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या