शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

महाराष्ट्रात पावणेदोन लाख पदे रिक्त, भरतीवर ‘ब्रेक’ लागल्याने शासकीय कर्मचा-यांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 17:31 IST

राज्य शासनाच्या ३० ते ३५ प्रशासकीय विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ गटनिहाय सरळसेवा आणि पदोन्नतीची सुमारे १ लाख ७७ हजार २५९ पदे रिक्त असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्य शासनाच्या ३० ते ३५ प्रशासकीय विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ गटनिहाय सरळसेवा आणि पदोन्नतीची सुमारे १ लाख ७७ हजार २५९ पदे रिक्त असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. एकीकडे ही महा‘रिक्त’ता असताना, महाराष्ट्रातील सुशिक्षितांना बेरोजगारीमुळे नैराश्याने गाठले आहे. शासनाने काही वर्षांपासून नोकरभरतीवर ‘ब्रेक’ लावल्याने एकूणच प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. सर्वच विभागांमध्ये प्रभारी कामकाज करीत असून, अपुºया मनुष्यबळामुळे वेळीच कामे पूर्ण करताना कर्मचाºयांची दमछाक होत आहे. दुसरीकडे पदव्या घेऊन सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात वणवण भटकंती करीत आहेत. नोकरी नाही, रिकाम्या हाताला रोजगार नाही, हे शल्य तरुणाईला प्रकर्षाने बोचत आहे. अभियांत्रिकी पदवीधर पुणे, मुंबई, अहमदाबाद येथील खासगी कंपन्यांमध्ये दरमहा १० ते १५ हजार रुपयांत नोकरी करीत आहे. गत आठवड्यात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार युवकांनी याच मुद्द्यावर ‘डीग्री जलाओ’ आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले, हे विशेष. शासनाने नोकरभरती बंद करून कंत्राटी कर्मचारी भरती केली आहे, तर राज्य शासनाच्याच सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी, कर्मचाºयांच्या पावणेदोन लाख रिक्त पदांची आकडेवारी माहिती अधिकारात दिली आहे. यात सरळसेवा आणि पदोन्नतीचीही पदे असली तरी महापालिका, महामंडळे, विद्यापीठे, स्वायत्त संस्थांमधील आकडेवारीचा समावेश नाही. राज्यात गृह विभागात सर्वाधिक पदे रिक्त आहेत.

अशा आहे विभागनिहाय रिक्त जागा-गृह विभाग - २३८९८, सार्वजनिक आरोग्य विभाग - १८२६१, जलसंपदा - १४६१६, कृषि व पदुम विभाग - ११९०७, उच्च व तंत्र शिक्षण विभाग - ३२३६, महसूल विभाग - ६३९१, वनविभाग - ३५४८, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये - ६४७८, वित्त विभाग - ६३७७, आदिवासी विकास विभाग - ६५८४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग - ३२८०, सार्वजनिक बांधकाम विभाग - ४३८२, सहकार व पणन - २५५१, वस्त्रोद्योग - ८९, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग - २४४७, उद्योग विभाग - १७००, कामगार विभाग - १११४, अन्न व नागरी, ग्राहक संरक्षण विभाग - २६४६, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग - ५५२, महिला व बाल विकास - १२४२, विधी व न्याय विभाग - ९२६, नगर विकास प्रशासन - ७२८, नियोजन विभाग - ४९८, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग - ४६८८, ग्रामविकास व जलसंधारण - १२०, पर्यटन विभाग - २५६, सामान्य प्रशासन विभाग - २०००, गृहनिर्माण विभाग - ३१२, अल्पसंख्याक विकास विभाग- १४, पर्यावरण विभाग- ५, मराठी भाषा विभाग- ६५, जिल्हा परिषदा- ४६३५१.

टॅग्स :jobनोकरी