शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

By admin | Updated: March 3, 2017 01:28 IST

रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

जयदीप हिरवे,पेठ- रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी झिरो बजेट नैसर्गिकशेती हाच एकमेव पर्याय असल्याने पेठ येथील उमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत लसूण या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.कंधारे यांनी सुमारे ४० गुंठे शेतीक्षेत्रात लसूण या पिकाच्या ४ गोण्यांची लागवड केली. या लसूण पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा या पिकाचेदेखील यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले. शेतात सऱ्या पाडून लसूण पिकाची लागवड करण्यात आली. दोन सऱ्यांमध्ये टोकण पद्धतीने हरभरा पीक घेतले. लसूण पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरण्यात आली. लसूण पिकाची लागवड, मजुरी व काढणीसाठी असा एकूण ४५ ते ५० हजार रुपये भांडवली खर्च आला. सुमारे साडेतीन महिन्यांतच लसूण काढणीस आला. लसणाच्या एका गोणीपाठीमागे १० गोण्या अशा एकूण ४० गोणी लसूण पिकाचे भरघोस उत्पादन निघाले.शेतीतज्ज्ञ सुभाष पालेकर यांच्यापासून प्रेरणा घेत कंधारे यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. कंधारे यांनी सर्वप्रथम देशी गायींचे संगोपन करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ५ देशी गायी आहेत. देशी गायीचे दूध व मलमूत्र आरोग्यवर्धक आहे. तसेच शेतामध्येही मलमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतच्या फवारण्या केल्या आहेत.मोकळी हवा व चांगल्या सूर्यप्रकाशामुळे लसणाचे पीक जोमदार आले. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळाले. देशी गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. याचबरोबर वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या १० झाडांचा पाला देशी गायीच्या गोमूत्रात कुजवून त्याचे दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या तीन फवारण्या या लसूण पिकावर करण्यात आल्या. याचबरोबर जीवामृत एकदा पाण्याबरोबर सोडण्यात आले, एकदा पिकांवर शिंपडले व एकदा त्याची फवारणी करण्यात आली. सर्वांत शेवटी अंतिम टप्यात देशी गायीच्या ताकाची एकदा संपूर्ण पिकावर फवारणी केली असल्याचे कंधारे यांनी सांगितले. >जमिनीची सुपीकता चांगली राहतेउमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा अवलंब करत शेतीमध्ये त्यांनी स्वत:ला अक्षरक्ष: वाहून घेतले आहे. त्यांच्याकडे या नैसर्गिक शेतीचे कृषी पदवीधरापेक्षाही अधिक ज्ञान आहे. सर्वांनीच या नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबरच मानवाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे कंधारे सांगतात.