शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 05:57 IST

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ६ नोव्हेंबरला होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांत वापरण्यास सर्वोच्च न्यायालयानेअजित पवार गटाला परवानगी दिली आहे. मात्र, या चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे जाहीर करणारा डिसक्लेमर प्रसिद्ध करण्याचे बंधनही न्यायालयाने त्या गटाला घातले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ६ नोव्हेंबरला होणार आहे.

घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत शरद पवार गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्य कांत, न्या. दीपांकर दत्ता, न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य लोकांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोटिसा जारी केल्या. घड्याळ चिन्हाचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करणारी जाहिरात मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्च व ४ एप्रिल रोजी अजित पवार गटाला दिला होता. मात्र, अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर करताना त्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे जाहीर केले नाही तसेच मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे हे चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करावी, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.

त्यावर, अजित पवार गटाने नवे हमीपत्र दाखल सादर करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या हमीपत्राचे उल्लंघन झाले तर त्याची आम्ही गंभीर दखल घेऊ. अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी आमच्या आदेशांचे पालन करावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

‘अजित पवार गटाला नवीन निवडणूक चिन्ह द्या’

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाला नवीन निवडणूक चिन्ह देण्यात यावे. मात्र, अजित पवार गटाचे वकील बलबीर सिंह यांनी सिंघवी यांच्या मागणीला विरोध केला. त्यांनी असा दावा केला की, सर्व पत्रके, प्रचार साहित्यामध्ये घड्याळ निवडणूक चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. ती पत्रके, प्रचारसाहित्य मी न्यायालयाला सादर करण्यास तयार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय