नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 12:24 IST2022-01-04T12:24:24+5:302022-01-04T12:24:48+5:30

Eknath Shinde Coronavirus Positive : सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन.

Urban Development Minister Eknath Shinde tested coronavirus positive said will be back soon | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचं आवाहन

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि काही नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वी दिली होती. आता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही राज्यातील नेत्यांना कोरोनाची लागण
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा (Coronavirus Patients) खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह (Delta Variant), ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. अधिवेशनाच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी दिली होती. 

Web Title: Urban Development Minister Eknath Shinde tested coronavirus positive said will be back soon