शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अवकाळी पाऊस पाठ सोडेना! मराठवाडा, कोकणातील अनेक जिल्ह्यांना फटका, अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 5:52 AM

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला वादळी पाऊस आणि गारपीट पिच्छा सोडायला तयार नाही. शनिवारीही मराठवाड्यासह कोकणातील अनेक भागात वादळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. 

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात  शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्या. यामुळे आंबा, द्राक्षांच्या बागांसह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि अन्य तालुक्यातही सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

मंदिरात पाणीच पाणीधाराशिव जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. तुळजापुरात झालेल्या धो-धो पावसामुळे बाहेरील पाणी मंदिराच्या परिसरात शिरले होते. उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वीज पडल्यामुळे सात शेळ्या ठार झाल्या, तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच याच तालुक्यातील तलमोड, तुरोरी, तुगाव येथे वीज पडून तीन पशुधन दगावले आहे.   

हिंगोलीमध्ये हळदीचे नुकसान हिंगोली जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. सायंकाळी हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

कुठे अवकाळी, तर कुठे उन्हाळाउष्णतेच्या लाटांसह अवकाळी पावसाने नागरिकांना नकोसे केले असून, हवामान बदलाचा हा कहर सुरूच आहे. आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत हलका पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर मुंबईतील उष्णतेची लाट ओसरली असली तरी आर्द्रतेत चढउतार असल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्ण व दमट परिस्थिती राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी रात्री हवामान उष्ण राहील. २९ जिल्ह्यांत या सप्ताहात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस