शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

भाजपचे 12 आमदार निलंबित; विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ, तालिका अध्यक्षांनाही शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 06:24 IST

पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा इंपिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे, अशा आशयाचा ठराव मांडला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

मुंबई : विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या १२ पैकी चौघे माजी कॅबिनेटमंत्री राहिले आहेत. भाजपच्या निलंबित आमदारांनी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन झालेली कारवाई बेकायदा असल्याचे निवेदन दिले. (Unprecedented commotion in the Legislative Assembly 12 BJP MLAs suspended)पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा इंपिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे, अशा आशयाचा ठराव मांडला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्यावर भुजबळ यांनी विस्तृत उत्तर दिले. कोणत्या दिवशी कसा पत्रव्यवहार झाला होता. कोणीकोणती पत्रे पाठवली हे त्यांनी तारीखवार सांगितले. याच उत्तरात भुजबळ म्हणाले, याच इंपिरिकल डाटाच्या आधारे उज्ज्वला गॅसधारकांना केंद्र सरकार मदत करत आहे. मग हा डाटा आम्हाला द्यायला काय अडचण आहे?  त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांचा त्वेष पाहून चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, गिरीश महाजन हे सदस्यही आक्रमक झाले. त्याचवेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले, ‘‘तुमचा तर आरक्षणाला विरोधच राहिलेला आहे. तुम्ही म्हणालात सत्ता द्या, चार महिन्यांत आरक्षण देतो. सत्तेचे काय घेऊन बसलात, तुम्ही ओबीसीचे नेतृत्व करा, श्रेयपण तुम्हीच घ्या; पण आम्हाला पंतप्रधानांकडे न्या आणि डाटा उपलब्ध करून द्या.’’छगन भुजबळ यांच्या या विधानावर फडणवीस बोलायला उभे राहिले तेव्हा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ठराव मतास टाकला. भुजबळांनी राजकीय भाष्य केले तर चालते आणि आम्हाला बोलू दिले जात नाही, असा मुख्य आक्षेप फडणवीस यांचा होता. त्यावरून गदरोळ सुरू झाला.अध्यक्षांच्या जागेवर सगळ्यात आधी गिरीश महाजन धावत गेले. त्यांच्यापाठोपाठ डॉ. संजय कुटे आणि अन्य सदस्यही धावले. अध्यक्ष ठरावाचे वाचन करत होते. तेव्हा जोरदार वादावादी सुरू झाली. कुटे यांनी अध्यक्षांचा माइक ओढला तर काही सदस्यांनी राजदंडाला हात घातला. ते पाहून अध्यक्षांनी ‘मी तुमच्यावर कारवाई करेन’, असा इशाराही दिला. परिस्थिती हाताबाहेर जात असलेली पाहून अ‍ॅड. आशिष शेलार वरती गेले व त्यांनी सगळ्या सदस्यांना जागेवर जाण्यास भाग पाडले. नंतर सभागृहाचे कामकाज पाचवेळा तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठका झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही बैठका झाल्या. सुरुवातीला उपाध्यक्ष झिरवळ यांच्या दालनात ते आणि भास्कर जाधव असे दोघेच होते. त्याठिकाणी भाजपचे काही सदस्य आले. त्यातील काहींनी भास्कर जाधव यांना शिवीगाळ केली. तेथे हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. शेवटी हा सगळा प्रकार भास्कर जाधव यांनीच सभागृहात कथन केला. सभागृहातील कामकाजाचे फुटेज पाहून अध्यक्षांच्या जागेवर कोणते सदस्य गेले होते, त्यांची नावे काढली गेली. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी १२ आमदारांच्या एक वर्षासाठीच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.विधान परिषदेचे १२ आमदार अद्याप राज्यपालांकडून नियुक्त झालेले नसताना, विधानसभेतील भाजपचे बारा आमदार कमी झाले. त्यामुळे १२ चा काटा बाराने काढला अशी खमंग चर्चा विधान भवनात होती.

यांच्यावर वर्षभरासाठी कारवाई- डॉ. संजय कुटे - जळगाव जामोद, जि. बुलडाणा- अ‍ॅड. आशिष शेलार - वांद्रे पश्चिम, मुंबई- अभिमन्यू पवार - औसा, जि. लातूर- गिरीश महाजन -जामनेर, जि. जळगाव- अतुल भातखळकर -कांदिवली पूर्व, मुंबई- पराग अळवणी - विलेपार्ले, मुंबई- हरीश पिंपळे - मूर्तिजापूर, जि. अकोला- राम सातपुते - माळशिरस, जि. सोलापूर- जयकुमार रावल - शिंदखेडा, जि. धुळे- योगेश सागर - चारकोप, मुंबई- नारायण कुचे - बदनापूर, जि. जालना- कीर्तिकुमार भांगडिया - चिमूर, जि. चंद्रपूर

शिवीगा‌ळ केली, राडेबाजासारखे तुटून पडलेसभागृहात बोलण्याची संधी दिली नाही म्हणून विरोधी पक्षनेते माझ्यावर रागावलेले होते. मी त्यांच्याशी बोलत असताना काही आमदार आत घुसले, त्यांनी मला अश्लील शिवीगाळ केली. राडेबाजांसारखे ते तुटून पडले.     - भास्कर जाधव

एकाही सदस्याने शिवी दिली नाही ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश दाखविल्यामुळे आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप लावून निलंबित केले. एक वर्ष काय, ५ वर्ष निलंबित केले तरी त्याची पर्वा नाही. भाजपाच्या एकाही सदस्यांनी शिवी दिली नाही.     - देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकार म्हणजे तालिबानी सरकारअध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिवीगाळ झालेली नसताना, उलट पक्षाच्या वतीने मी तालिका अध्यक्षांची स्वतः क्षमा मागितली असतानाही मला निलंबित केले गेले. ही ठाकरे सरकारची तालिबानी वृत्ती आहे.      - आशिष शेलार 

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाMLAआमदारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे