शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मविआ'ची एकीची मोट, वंचितचा समावेश; आधी किमान समान कार्यक्रम मग जागावाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 06:55 IST

Lok sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीची एकीची मोट बांधली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

मुंबई -  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीची एकीची मोट बांधली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने वेगळी निवडणूक लढवल्याने त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला होता. आता आंबेडकर सोबत आल्याने या दोन्ही पक्षांसह शिवसेना ठाकरे गटानेही सुटकेचा निःश्वास सोडला.

निमंत्रण पत्रावर केवळ राज्यातील नेत्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने नाराजी व्यक्त करत जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीकडे आंबेडकर यांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर त्यांची नाराजी दूर केल्यानंतर दुसऱ्या बैठकीला त्यांनी प्रतिनिधी पाठवला होता. तर तिसऱ्या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहिले.

मविआच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आपण एकत्र राहून काम करायचे आणि एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे आमचे ठरले आहे, असे बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले.

भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशभरातील भाजपेतर पक्षांनी 'इंडिया आघाडी' स्थापन केली. मात्र, आता ही आघाडीच शिल्लक राहिलेली नाही, आमचे आता ठरलेले आहे, महाविकास आघाडीची 'इंडिया आघाडी होऊ नये अशी दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यामुळे ताक जरी असले तरी फुंकून फुंकून प्यायचे, असे मी ठरवलेले आहे.- अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

'किमान समान' साठी समितीची स्थापनामविआचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल, आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करेल व त्यानंतर पुढील आठवड्यात मविआच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार आहे.

८ जागांचा तिढा कायम, जागावाटपाला गती?■ बैठकीत अॅड. आंबेडकर यांनी मांडलेल्या मुद्यांवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमात कोणते मुद्दे असावेत यावर चर्चा झाली, यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांचे वाटप झाल्याचे समजते. उर्वरित ८ जागांचा तिढा कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. जिथे शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस दावा करत आहेत.

याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर- पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र २०१९ त्या निवडणुकीत या दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. त्यामुळे ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही. शुक्रवारच्या बैठकीतही यावर निर्णय झाला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत. सध्या वंचितला अकोला आणि राजू रोट्टी यांना हातकणंगले या जागा दिल्या जाणार आहेत. मात्र आंबेडकर एका जागेवर समाधानी होणार नसल्याने पुढील बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस