रात्र महाविद्यालयांसाठी सेंट झेवियरमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:31 IST2017-12-01T15:30:13+5:302017-12-01T15:31:09+5:30
सेंट झेवियर कॉलेजमध्ये 25 नोव्हेंबर रोजी देशभरातील रात्र महविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नाव होते सितारे.

रात्र महाविद्यालयांसाठी सेंट झेवियरमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम
मुंबईः सेंट झेवियर कॉलेजमध्ये 25 नोव्हेंबर रोजी देशभरातील रात्र महविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नाव होते सितारे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक विद्यार्थी झेवियरमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, मालेगाव, इचलकरंजी आदी भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात भाग घेऊन आपले कला गुण सादर केले. यश- अपयशाच्या पलीकडे जावून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत पुण्याच्या सेंट विन्स्लेट कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेंट झेविअर कॉँलेजने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. राहणे, खाणे, प्रवासाचा खर्च देखील झेवियर कॉलेजने दिला.
विशेष म्हणजे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकरण्यात आले नाही. झेवियरने घेतलेल्या या स्पर्धांचे सर्वांनी कौतुक केले. रात्र महाविद्यालयांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धांची आवश्यकता असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले.