Maharashtra Politics: “अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:35 PM2022-10-04T12:35:26+5:302022-10-04T12:36:55+5:30

Maharashtra News: पहाटेचा शपथविधी घेऊन अजित पवारांना जमले नाही, ते डेअरिंग एकनाथ शिंदेंनी करून दाखवले, असे रामदास आठवले म्हणाले.

union minister ramdas athawale said we will be welcome ncp ajit pawar in shiv sena eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Maharashtra Politics: “अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर

Maharashtra Politics: “अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर

Next

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध मुद्द्यांवरुन राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी मदत करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यातच अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे, अशी खुली ऑफर रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. 

रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉपी करत राहुल गांधी पावसात भिजले तरी काँग्रेसला भिजवण्याची ताकद त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांना फारसा फायदा होणार नाही. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत जोडण्यापेक्षा भारत तोडण्यासाठी यात्रा आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देण्याची ताकद ही राहुल गांधी मध्ये नसल्याचा घणाघात आठवले यांनी केला. 

अजित पवार युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे

अजित पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय असून त्यामुळे आम्ही केव्हा येऊ हे सांगता येणार नाही असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. कदाचित अजित पवार इकडे येत असतील ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे, पहाटेचा शपथविधी घेऊन जे अजित पवारांना जमले नाही ते धाडस एकनाथ शिंदेंनी केले, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, दसरा मिळाव्यात जरी उद्धव ठाकरे यांनी टीका टिपणी केली तरी त्यास उत्तर देण्याचे सामर्थ्य हे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे गुलाबराव पाटलांना पान टपरीवाले असे हिणवले जाते पण हा पान टपरीवाला कधी कुणाला चुना लावेल हे सांगता येत नाही, ज्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेला चुना लावला हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवसेनेने गद्दार म्हणत व्यक्तिगत टीका करू नये असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: union minister ramdas athawale said we will be welcome ncp ajit pawar in shiv sena eknath shinde and bjp devendra fadnavis govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.