केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:12 IST2025-01-24T08:48:57+5:302025-01-24T09:12:42+5:30

Amit Shah : अमित शाह यांचे आज सकाळी ११:५५ वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे.

Union Home Minister Amit Shah will visit Nashik today and attend various programs including the Cooperative Conference! | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार!

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असणार आहेत. दुपारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत मालेगाव तालुक्यातील अजंग येथे आयोजित सहकार परिषदेस ते उपस्थित राहणार आहेत. 

अमित शाह यांचे आज सकाळी ११:५५ वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता ते हेलिकॉप्टरने मालेगावकडे रवाना होतील. दुपारी २ वाजता अजंग येथे आयोजित सहकार परिषदेस ते उपस्थित राहणार आहेत. 

त्यानंतर गीर गार्थीच्या प्रकल्प पाहणीसह ते इतर प्रकल्पांना भेट देणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यादृष्टीने नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल देखील या दौऱ्यात सहभागी राहणार आहेत.

Web Title: Union Home Minister Amit Shah will visit Nashik today and attend various programs including the Cooperative Conference!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.