शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Leena Nair Global CEO Of CHANEL : कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका; फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:12 AM

Leena Nair : नायर या गेल्या 2013 मध्ये लंडन येथे शीफ्ट झाल्या होत्या. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून, काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

भारतीय वंशाच्या आणि मुळच्या कोल्हापूर येथील असलेल्या लीना नायर (Leena Nair) यांची मंगळवारी लंडन येथील फ्रेंच लक्झरी समूह शनेलच्या (Chanel) जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 52 वर्षीय लीना नायर या युनीलीव्हरमधील (unilever) सर्वात कमी वयाच्या पहिला महिला मुख्य मानव संसाधन अधिकारी होत्या. त्या 2016 मध्ये  युनीलीव्हरच्या सीएचआरओ झाल्या होत्या. यापूर्वी त्या Anglo-Dutch कंपनीच्या लंडन हेडक्वॉर्टरमध्ये लिडरशीप आणि ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट होत्या. (leena nair appointed as Global CEO of french luxury group chanel)

लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका - लंडनमध्ये डंका वाजवणाऱ्या लीना नायर यांनी आपले शालेश शिक्षण कोल्हापूर येथील होली क्रॉस शाळेतून पूर्ण केले. यानंतर, सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. तर जमशेदपूर येथील झेव्हियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.

लिना नायर या युनीलीव्हरमध्ये मुख्य मानव संसाधन अधिकारी होत्या. त्यांचे आभार मानताना युनीलीव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन जोप म्हणाले, लीना यांनी साधारणपणे गेली तीन दशके कंपनीसाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले आहे. नायर या गेल्या 2013 मध्ये लंडन येथे शीफ्ट झाल्या होत्या. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून, काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रLondonलंडन