शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागतं, पण त्याचं महिमामंडन...; फडणवीसांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:06 IST

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केलं जात आहे.

CM Devendra Fadnavis: औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने भाजप आक्रमक झालेली असतानाच मविआनेही सरकारवर पलटवार करत औरंगजेबाच्या कबरीला देण्यात आलेल्या संरक्षणावर बोट ठेवलं. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भिवंडीतील एका कार्यक्रमात भाष्य करत दुर्दैवाने आपल्याला औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागत असलं तरी या महाराष्ट्रात त्याचं महिमामंडन होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. शेतकरी, बलुतेदारांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले. आपल्याला देव, देश, धर्मासाठी लढायला तयार केले. हे जे बीजारोपण त्यांनी केले त्यामुळेच नंतर संभाजी महाराज राजाराम महाराज, ताराराणी यांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने ५० वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. परंतु या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन कधीच होणार नाही," असा शब्द फडणवीस यांनी यावेळी दिला. 

हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर इथं असलेली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केलं जात आहे. शासनाने कबर उद्ध्वस्त न केल्यास आम्ही कारसेवा करून हे काम करू, असा इशारा या संघटनांकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर