वीज अंगावर पडून सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा दुदैवी अंत

By Appasaheb.patil | Updated: May 21, 2019 20:39 IST2019-05-21T20:35:06+5:302019-05-21T20:39:08+5:30

सोलापूर जिल्ह्यातील घटना;वादळी वाºयासह पावसाने जोरदार लावली हजेरी

The unfortunate end of both of the Solapur district fell on the electricity lines | वीज अंगावर पडून सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा दुदैवी अंत

वीज अंगावर पडून सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा दुदैवी अंत

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला- वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात उडाला गोंधळ- दोघांच्या दुदैवी मृत्यूने करजगी व बोरामणी गावावर शोककळा

सोलापूर : वादळी वाºयासह जोरदार पावसावेळी वीज अंगावर पडून दोघांचा दुदैवी अंत झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात घडली.

बोरामणी येथील रोहित लिंबण्णा सुतार  व अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील समर्थ नागनाथ गंगदे (वय १२) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत़ मंगळवारी सोलापुरात दिवसभर कडक उन्हाचा तडाखा बसत असताना अचानकपणे सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला. त्यात करजगी येथे झालेल्या जोरदार पावसावेळी विजेचा कडकडाट होऊन अंगावर वीज कोसळल्याने समर्थ गंगदे या बारा वर्षीय मुलाचा अंत झाला़ तर बोरामणी (ता़ द़ सोलापूर) येथील रोहित सुतार या मुलाच्याही अंगावर वीज पडल्याने त्याचाही जागीच अंत झाला. मंगळवारी सायंकाळी सात ते नऊच्या सुमारास शहर व जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. काहीकाळ वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.


 

Web Title: The unfortunate end of both of the Solapur district fell on the electricity lines