शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 07:22 IST

आमच्यासोबतच्या विद्यमान आमदारांनाही आम्हाला तिकिटे देता येणार नाहीत ही अडचण अजित पवार गटाने चर्चेत मांडली आहे. शिंदे सेनेकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत आणि त्यांना ३८-४० जागा जास्त दिल्या जात असतील तर दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का?

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्यावेळी किती आमदार निवडून आले यापेक्षा आता सोबत किती आहेत याचा आधार घेत भाजपने अजित पवार गटाला ४२ ते ४५ जागा देऊ केल्याने या गटात अस्वस्थता आहे. शिंदेसेनेला ८५ ते ८८ जागा देण्याची भाजपची तयारी आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळेच  जागावाटपाचा फॉर्म्युला घटस्थापनेच्या मुहुर्तावर जाहीर झाला नाही असे समजते.

भाजपने १६० जागा लढविण्याची तयारी चालविली आहे. मित्रपक्षांचा दबाव वाढला तर तीन-चार जागा कमी घेण्याची भाजपची तयारी असेल, पण १५५-१५६ पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत असा आग्रह राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रवादीने २०१९ मध्ये ५४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस व अपक्ष मिळून पाच आमदार त्यांच्यासोबत आहेत. आणखी सहा ते सात जागा मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे. 

‘त्या’ जागा सरसकट देऊ नकासूत्रांनी सांगितले की, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपच्या नेत्यांनी याकडे लक्ष वेधले की निवडून आलेल्या ५४ पैकी ३८ ते ३९ एवढेच आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे आज शरद पवार गटाकडे असलेल्या विधानसभेच्या जागा महायुतीत सरसकट अजित पवार गटाला देता येणार नाहीत. शरद पवार गटाकडे असलेल्या बहुतेक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

‘जागावाटप सन्मानपूर्वक सुरू’अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र नाराजीचा सूर न लावता, जागावाटपाचे काम सन्मानपूर्वक सुरू असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला.

दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का?४०-४२ जागा आम्ही घेतल्या तर आमच्यासोबतच्या विद्यमान आमदारांनाही आम्हाला तिकिटे देता येणार नाहीत ही अडचण अजित पवार गटाने चर्चेत मांडली आहे. विद्यमान आमदारांचा निकष लावता तर शिंदे सेनेकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत आणि त्यांना ३८-४० जागा जास्त दिल्या जात असतील तर दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का? असा प्रश्नही अजित पवार गटाकडून गेल्या काही दिवसांत झालेल्या जागावाटपाच्या चर्चेत करण्यात येत आहे.

अडचण नेमकी काय?२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती होती. त्यामुळे गेल्यावेळी शिवसेना पराभूत झाली असे मतदारसंघ शिंदेसेनेला देण्यात भाजपला अडचण नाही. मात्र, राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढलेली होती. राष्ट्रवादीचे जे आमदार आज अजित पवारांसोबत आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजप-शिवसेनेकडे अनेक ठिकाणी प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला महायुतीत अधिक जागा देण्यात अडचणी येत आहेत.‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्याबाबत भाजपला शिंदेसेनेची अडचण नाही पण अजित पवार गटाबाबत अडचण जात आहे.शिंदे सेनेला ८८, अजित पवार गटाला ४२ जागा दिल्या तर भाजपच्या वाट्याला १५८ जागा येतील. हा फॉर्म्युला मान्य व्हावा असा भाजपचा आग्रह असल्याचे म्हटले जाते.अजित पवार यांनी फारच आग्रह धरला तर भाजप आपल्या वाट्याच्या दोन-तीन जागा देईल आणि शिंदे गटालाही दोन-तीन जागा द्यायला सांगेल,अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४