शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते - उमा भारती

By admin | Updated: August 18, 2016 16:15 IST

आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 18 : आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. स्वत:चे बलिदान देऊन देशाचे रक्षण करायला ते सदैव सज्ज असतात. परंतु शत्रूचे प्राण घेऊनदेखील देशाचे रक्षण होऊ शकते, असे मत केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जवानांना राख्या न बांधता त्यांना टीका लावून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

पोलीस, सैन्य, अर्धसैनिकदलाचे जवान अडचणींमध्ये काम करत असतात. अनेकदा दुर्गम भागात खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. परंतु तरीदेखील जवान जोमाने देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. या जवानांच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. वेळ आली तर त्यांच्यासोबत सीमेवरदेखील जायला तयार आहे, असे उमा भारती म्हणाल्या. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही कालावधीपासून तणावाची स्थिती आहे. येथील २ तरुण एका पोलिसाची बंदूक हिसकत असल्याचे दृश्य पाहिले व फार वाईट वाटले. तेथील पोलीस, सैनिक यांच्यात सर्व अडचणींचा सामना करुन देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आहेत. परंतु त्यांचे हात बांधलेले आहेत. हे पाहून फार दु:ख होते, असे त्या म्हणाल्या.