शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर : चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:08 IST

उल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन. अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.

ठळक मुद्देउल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन.अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन केले. यानंतर एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिले.

उल्हासनगरात पाणी पुरवठ्याचे वितरण असमान होत असून  काही ठिकाणी दिवसाला दोन वेळा तर शहर पूर्वेला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कॅम्प नं-३ चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी निर्माण झाली. काही दिवसा पासून टाकलेल्या नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा न झाल्याने, जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याची मागणी झाली. मात्र शेकडो महिला गुरवारी रस्त्यावर येऊन, त्यांनी चोपडा कोर्ट चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या खाली ठिय्या आंदोलन केले. पाणी द्या, पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. महापालिका पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासह देऊनही महिला व नागरिक ऐकत नव्हते. 

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी आंदोलन करणाऱ्या महिला पैकी काही जणांना कार्यकारी अभियंता कार्यालयात चर्चेला बोलाविले. जुन्या जलकुंभात पुरेसा पाणी साठा जमा होत नसल्याने व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने चोपडा कोर्ट व आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती दिली. दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असलेतरी एक आठवडा पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी लागेल, असे रहेजा म्हणाले. शहर पूर्वेतील बहुतांश भागात दिवसाआड व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांत खदखद आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने शहर पूर्वेतील पाणी टंचाई सोडविली नाहीतर, येथेही असाच उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

शिवसेना नगरसेवकावर नाराजीकॅम्प नं-३ चोपडा व आंबेडकरनगर परिसरातून सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. सत्तेत असूनही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे. पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी