शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

एवढं कौतुक झालं की आजुबाजुला कोणी हरभऱ्याचं झाडं लावलंय का बघत होतो- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 8:20 PM

माझं चुकत असेल तर मित्रत्त्वाच्या नात्याने आवर्जून मला सांगत जा.

सातारा: आज व्यासपीठांवर झालेल्या भाषणांच्यावेळी अनेक मान्यवरांकडून माझी खूपच स्तुती केली जात होती. तेव्हा मी आजुबाजुला कुणी एखादं हरभाऱ्याचं झाड लावलंय का, हे बघत होतो, अशी मिष्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आज साताऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये उदयनराजेंची तोंडभरून स्तुती केली. कार्यक्रमाच्या शेवटी केलेल्या भाषणात उदयनराजे यांनी विनोदी शैलीत या सगळ्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आज व्यासपीठावर अनेक मान्यवरांकडून कारण नसताना माझी स्तुती केली जात होती. त्यावेळी मी आजुबाजुला हेच पाहत होतो की, इथे कोणी हरभऱ्याचे झाड लावले आहे का? एवढं कौतुक ऐकून डायबेटीस होईल, असं वाटत होतं. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला. परंतु याच कौतुकामुळे आपल्याला काम करण्यासाठी उर्जा आणि ताकद मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले. आपल्या भाषणादरम्यान उदयनराजे यांनी शरद पवार यांचा विशेष उल्लेख केला. आज मी पवार यांना एवढंच सांगू इच्छितो की, कधी माझं चुकत असेल तर मित्रत्त्वाच्या नात्याने आवर्जून मला सांगत जा. तुमच्या भावनेचा आणि प्रेमाचा कधी अवमान होणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असेही उदयनराजे यांनी सांगितले.यावेळी उदयनराजेंनी श्रोत्यांना एक मजेशीर किस्साही सांगितला. यापूर्वी गांधी मैदानावर झालेल्या सभेत मी सांगितलं  होतं की, ३६५ दिवस २४ तास कधीही मला हाक मारा. मी तुमच्या सेवेशी हजर आहे. त्यानंतर एकदा रात्री पावणेदोनला मला काही युवकांचा फोन आला. मी म्हणालो, काय झालंय. तर त्या युवकांनी सांगितलं की,  असंच पिक्चरला आलो होतो. तुम्ही म्हणाला कधीही फोन करा म्हणून रात्री तुम्हाला कॉल केला, असं उदयनराजेंनी सांगताच पुन्हा जोरदार हशा पिकला.

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, उदयनराजेंविषयी संपूर्ण देशातील खासदार मंडळींना कायमच उत्सुकता असते. ते दिल्ली कमी बोलत असले तरी जेव्हा बोलतात तेव्हा साताऱ्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल एकत्रित येऊन काय करावं लागेल, याचीच चर्चा करत असतात. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या सोबत असून यापुढेही भविष्यात आम्हा सर्वांची साथ तुम्हाला असेल, असे सूचक विधान करून भविष्यातील राजकीय घडामोडींची चुणूक शरद पवार यांनी दाखविली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार