Delhi Election: आपणच देशप्रेमी हा भ्रमाचा भोपळा फुटला; दिल्ली निकालावरून उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:30 AM2020-02-12T05:30:28+5:302020-02-12T08:16:45+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Uddhav Thackeray's troop bjp from Delhi Result | Delhi Election: आपणच देशप्रेमी हा भ्रमाचा भोपळा फुटला; दिल्ली निकालावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Delhi Election: आपणच देशप्रेमी हा भ्रमाचा भोपळा फुटला; दिल्ली निकालावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विधानसभा निवडणूक निकालावरुन भाजपला हाणले आहे.
एका निवेदनात ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने मिळविलेल्या जबरदस्त यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘ दिल्लीतील जनतेने ‘‘मन की बात नव्हे’’ तर ‘‘जन की बात’’ आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही , बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून , अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करुनसुद्धा अरविंद केजरीवाल याना ते पराजित करू शकले नाहीत , दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि जनतेने लोकशाहीवरील भरोसा कायम असल्याचे दाखवले. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो’,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Uddhav Thackeray's troop bjp from Delhi Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.