मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने घेतलेली आडमुठी भूमिका तसेच शिवसेना नेत्यांकडून होत असलेल्या विधानांवरून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले सर्व पर्याय खुले असल्याचे विधान धक्कादायक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला १६० हून अधिक जागा मिळाल्या. त्यापैकी १०५ जागा एकट्या भाजपाला मिळाल्या होत्या. दुर्दैवाने आमच्या काही जागा कमी आल्या. त्याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करण्याबाबत आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांचे हे विधान आमच्यासाठी धक्कादायक होते. जनतेने महायुतीला मतदान केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे असे का म्हणाले असावेत असा प्रश्न आम्हाला पडला.''
महाराष्ट्र निवडणूक 2019 : निकालाच्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं 'ते' विधान धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'दे धक्का'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 18:02 IST