उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे स्टार प्रचारक ठरले! ओमराजे निंबाळकर, शरद कोळी, किरण माने यांना मैदानात उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 00:00 IST2025-11-08T23:41:08+5:302025-11-09T00:00:17+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Uddhav Thackeray's party has become a star campaigner! Omraje Nimbalkar, Sharad Koli, Kiran Mane have been fielded | उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे स्टार प्रचारक ठरले! ओमराजे निंबाळकर, शरद कोळी, किरण माने यांना मैदानात उतरवले

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे स्टार प्रचारक ठरले! ओमराजे निंबाळकर, शरद कोळी, किरण माने यांना मैदानात उतरवले

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ४० जणांची नावांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांमध्ये सुषमा अंधारे, किरण माने आणि शरद कोळी यांच्या नावांचा समावेश आहे.

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत खराब आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राऊतांच्या नावाचा समावेश आहे. ठाकरे गटाने ४० स्टार प्रचारकाची नावे जाहीर केली आहेत. ही यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे. 

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

या नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे , सुनील प्रभू, आदेश बांदेकर, वरुण सरदेसाई, अंबादास दानवे, रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बनूगडे पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे,संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शीतल शेठ–देवरूखकर,जान्हवी सावंत,शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, वैभव नाईक,नितीन देशमुख , आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वाडले   या नेत्यांचा ठाकरे गटाने स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. 

स्टार प्रचारकांची संख्या निवडणूक आयोगाने वाढवली आहे. या आधी प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली. स्टार प्रचारकांची संख्या वाढवण्याची मागणी राज्यातील सगळ्याच राजकीय पक्षांनी केली होती. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने ही संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : उद्धव ठाकरे की पार्टी ने स्थानीय चुनावों के लिए स्टार प्रचारकों की घोषणा की।

Web Summary : शिवसेना (यूबीटी) ने आगामी स्थानीय चुनावों के लिए सुषमा अंधारे, किरण माने और शरद कोली सहित अपने स्टार प्रचारकों की सूची का अनावरण किया। चुनाव आयोग को सौंपी गई 40 सदस्यीय सूची में संजय राउत भी शामिल हैं, हालांकि उनका इलाज चल रहा है।

Web Title : Uddhav Thackeray's party announces star campaigners for local elections.

Web Summary : Shiv Sena (UBT) unveils its star campaigners list, including Sushma Andhare, Kiran Mane, and Sharad Koli, for upcoming local elections. The 40-member list, submitted to the Election Commission, also features Sanjay Raut, despite his ongoing medical treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.