शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या...", मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भरतशेठ गोगावलेंचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:42 IST

Bharatshet Gogawale : भरतशेठ गोगावले हे फोनद्वारे आरक्षण दिल्ल्याबद्दल आपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा कण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देत आहेत.

Bharatshet Gogawale : (Marathi News) मुंबई : राज्य सरकारने आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मांडले. यानंतर या विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने संमती दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. मराठा आरक्षण संदर्भात विधेयक मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार, नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघात याचा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहे.  यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भरतशेठ गोगावले हे फोनद्वारे आरक्षण दिल्ल्याबद्दल आपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा कण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देत आहेत.

भरतशेठ गोगावले फोनवर म्हणाले की, "१०-१० हजाराच्या दोन फटाक्याच्या माळा लावल्या पाहिजे. फटाक्यांच्या आवाजाने उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत. या माळांमध्ये सुतळी बॉम्ब लावा. सर्वांना फोन करुन सर्व मराठ्यांना बोलावून घ्या. खरे मराठे असेल तर तिथे जमा व्हा, असं त्यांना आवाहन करा. जो मराठा नसेल तो येणार नाही, असं सांगा. सर्व कार्यकर्त्यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. आपले सर्व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक सर्व तिथं हजर पाहिजेत. पेढे वाटा. तुमच्या आनंदोत्सवाचे फोटो इकडे यायला पाहिजे. साहेबांना दाखवायचं आहे, महाड विधानसभा मतदारसंघात कसा जल्लोश झाला आहे." 

मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूरदरम्यान, आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विशेष अधिवेशनादरम्यान सभागृहात मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक मांडत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा केली आहे. तसेच, मराठा आरक्षण विधेयकाबद्दल माहिती दिल्यानंतर या विधेयकाला आपण एकमताने मान्यता देऊ, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. त्यानंतर विरोधकांनी संमती दिल्याने सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रSocial Viralसोशल व्हायरल