शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:01 IST

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची भूमिका ; विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती

ठळक मुद्देजिल्हा आता दुष्काळी नाही, बरेच क्षेत्र सिंचनाखाली - तानाजी सावंत समांतर पाईपलाईन झाली तरच उजनीचे नियोजन शक्य  - तानाजी सावंत महाराष्ट्रातील १३५ जागा कोणत्या हे आम्ही सांगणे उचित होणार नाही - तानाजी सावंत

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल माझे अभिनंदन करायला आले होते. त्यांनी अभिनंदन केले याचा अर्थ ते शिवसेनेत आले किंवा आम्ही त्यांना आमंत्रित केले. किंवा ते फारच आतुर आहेत, असा होत नाही. त्यांच्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील, असे स्पष्टीकरण जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले. 

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण कशा पध्दतीने लढायचे याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील. त्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील. 

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला किती जागा मागायच्या हे ठरलेले नाही. पण जे काही करायचे आहे ते पक्ष प्रमुखांकडे करु. ते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही जागा मागू. सध्या भाजपला १३५ आणि शिवसेनेला १३५ जागा देणे निश्चित झाले आहे. मित्रपक्षांना १८ जागा मिळतील. 

बार्शीची जागा सेनेकडे राहणार का?, असे विचारले असता सावंत म्हणाले, आज कोणत्याही एका जागेबद्दल बोलता येणार नाही. महाराष्ट्रातील १३५ जागा कोणत्या हे आम्ही सांगणे उचित होणार नाही. ते पक्ष प्रमुख सांगतील. आदेश आले की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगण्यापूर्वी माध्यमांना सांगू. जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदा माझ्या माध्यमातून मंत्रीपद मिळाले. माढा विधानसभेबाबत आताच काही सांगणार नाही. पण आम्ही जिंकण्याच्या ताकदीने लढणार आहोत. कुणाला कौल द्यायचा हे शेवटी मतदार ठरविणार आहेत.

जिल्हा आता दुष्काळी नाही, बरेच क्षेत्र सिंचनाखाली- सोलापूर जिल्हा आता दुष्काळी जिल्हा राहिला नाही, असे मतही तानाजी सावंत यांनी व्यक्त केले. बरेच क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जिल्ह्यातील अनेक उताºयावर केवळ जिरायती असे दिसणार नाही. उजनीच्या पाण्याच्या नियोजन काटेकोरपणे गरजेचे आहे. या पध्दतीने काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. हे पाणी १२ महिने पुरले पाहिजे. आदेश अधिकाºयांना दिले आहेत. 

समांतर पाईपलाईन झाली तरच उजनीचे नियोजन शक्य - जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उजनीच्या नियोजनावर भाष्य केले. सोलापूर शहराला अर्धा टीएमसी पाणी लागते. पण त्यासाठी चार टीएमसी पाणी सोडावे लागते. वर्षभरात जवळपास १५ टीएमसी पाणी जादा लागते. त्यातून उजनीच्या पाण्याचे नियोजन बिघडते. जोपर्यंत उजनी ते सोलापूर ही नवी पाईप लाईन होत नाही तोपर्यंत पाणी असेच वाया जाणार. उजनीच्या मूळ आराखड्यानुसार पाण्याचे नियोजन होणार नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Sopalदिलीप सोपल