शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

Maharashtra CM: उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, चंदूमामांनी दिले आशीर्वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:42 AM

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझानं चंदूमामांशी बातचीत केली आहे. उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, असा आशीर्वादही चंदूमामांनी दिला आहे. उद्धवला आम्ही लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलं आहे. आज जर मीनाताई आणि बाळासाहेब असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता, साहेबांचं उद्धव ठाकरेंवर जास्त प्रेम होतं. उद्धवच्या जन्मानंतरच मार्मिक आणि शिवसेनेचा जन्म झाला. उद्धवला या सर्व राजकीय वातावरणाची बालपणापासूनच सवय झाली होती. उद्धव शाळेत असताना बालमोहनचे प्राध्यापक त्यावेळी घरी(मातोश्रीवर) यायचे, पण उद्धवनी साहेबांचा मुलगा असल्याचं कधीच दाखवलं नाही, असंही चंदूमामा म्हणाले आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे फोटोग्राफीचं कौशल्य होतं, ते उद्धव ठाकरेंनी आत्मसाद केलं.तर बाळासाहेबांकडून राज हे चित्रकला शिकले. कॅमेरा आणि लेन्स यामध्येच उद्धव ठाकरे जास्त गुंतायचा. कुठलीही गोष्ट मनावर घेतली, ती साध्य करूनच दाखवायचा. साहेबांच्या दोन पावलं तो पुढेच गेला. साहेब गेल्यानंतरही त्यानं मुंबई महापालिकेतली शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवली. उद्धव स्वतःहून राजकारणात आला. उद्धव ठाकरेंचा स्वभाव मनमिळावू आहे, बंदूक घेऊन शिकारी करण्याची आवड होती, अशा अनेक गोष्टी चंदूमामांनी सांगितल्या आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस