शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्तरावर महाआघाडीचा प्रयोग झाल्यास काय करणार उद्धव ठाकरे म्हणतात…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 10:43 IST

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर असा प्रयोग झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे तीन पक्षांच्या सरकारच्या नेतृत्वाची धुरा एक आव्हान म्हणून स्वीकारलेली आहेसगळय़ांनी सहकार्य केलं तर आपलं राज्य हे देशाला नवी दिशा दाखवेल, शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत

मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाची असलेले संबंध तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली होती. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर असा प्रयोग झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 महाविकास आघाडीच्या प्रयोगालाआता सुरुवात राज्यात तर झालेली आहे. देशाने त्यातून काही धडा घेतलाय… न घेतलाय… आपल्याला कळलं पाहिजे. ते कळत नाही तोपर्यंत बोलण्यात काय अर्थ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीच्या शेवटच्या भागात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबाबत भाष्य केले आहे.‘’हा महाराष्ट्र देशाला नवीन दिशा दाखवत आला आहे. म्हणूनच मी  तीन पक्षांच्या सरकारच्या नेतृत्वाची धुरा एक आव्हान म्हणून स्वीकारलेली आहे. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की, महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. त्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आपण लोक इतिहासामध्ये रमण्याच्या बरोबरीने इतिहास घडवण्याच्या मागे लागले पाहिजे. सगळय़ांनी सहकार्य केलं तर आपलं राज्य हे देशाला नवी दिशा दाखवेल.’’असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

दरम्यान, शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत, असेही उद्धव  ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.  उद्धव ठाकरे यांना सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱ्या कोणाकडे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. 'रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला… तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण