शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच"; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 18:23 IST

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली असली तरी आता संजय राऊत यांनी म्हत्त्वाचे विधान केलंय.

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरु झालीय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार गटानेही प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र शुक्रवारी मुंबईत झालेल्या मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मविआतील नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असं म्हटलं होतं. त्यानतंर आता खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मनात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असल्याचे विधान केलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा असे  उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला आम्ही बिनशर्त पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा आणि मगच निवडणूक प्रचाराला सुरुवात करा, असे उद्धव म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर काँग्रेस आणि शरद पवार गटाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानतंर आता संजय राऊत यांनी मला मुख्यमंत्री करा असे उद्धव ठाकरे म्हणाले नसल्याचे म्हटलं आहे. संजय राऊत नागपुरात बोलत होते.

"जागावाटप लवकरच होणार आहे. कोणतीही अडचण नाही. मुंबईत महाविकास आघाडीचा मोठा मेळावा झाला. तिथे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागावाटपावरुन मतभेद नसल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंना पुढे येण्याची गरज नाही. २०१९ सालीही ते मुख्यमंत्री होण्यासाठी पुढे आले नव्हते. सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगले काम केले. उद्धव ठाकरे यांनी कधीच म्हटलेलं नाही की, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असेल तर समोर आणावा. त्याला उद्धव ठाकरे समर्थन देण्यासाठी तयार आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे आहेत," असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याचा स्वाभिमान जपण्यासाठी लढा द्यावा लागेल, असं म्हटलं. आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो. इथं शरद पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस