Sanjay Raut: संजय राऊतांचा होळीच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभ संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 11:19 IST2023-03-07T11:19:06+5:302023-03-07T11:19:40+5:30

मी सकाळी चांगलंच बोलतो - संजय राऊत

Uddhav Thackeray Group Sanjay Raut's auspicious message to Chief Minister Eknath Shinde on Holi shivsena Shakha | Sanjay Raut: संजय राऊतांचा होळीच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभ संदेश

Sanjay Raut: संजय राऊतांचा होळीच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभ संदेश

भगवा रंग तर आम्हाला प्रिय आहेच मात्र कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. सर्व रंग हे निसर्गाने दिलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवले, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी होळीच्या दिवशी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंना देखील त्यांनी शुभ संदेश दिला आहे. 

मी सकाळी चांगलंच बोलतो, ठाण्यात जे सुरु आहे ते थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजप तुमचा वापर करत आहे. तुम्ही किती मोठी चूक केली आहे ती तुम्हाला कळेल. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात असाल तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही. हा शुभ संदेश मी मुख्यमंत्र्यांना देत आहे, असे राऊत म्हणाले. सत्ताधारीच बेकायदेशीर आहेत.  मी त्यांना काय सांगणार असा टोला देखील राऊतांनी लगावला. 

शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा हा राडा ठाण्यातच सुरु आहे. कारण या गटाचे अस्तित्व ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा गैरवापर होत आहे.  हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचे काम नाही. पोलिसांच्या आड हल्ले करु नका, समोर या. हे फक्त ठाण्यातच सुरु आहे.  मात्र हे देखील लवकरच संपेल. खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. 

Web Title: Uddhav Thackeray Group Sanjay Raut's auspicious message to Chief Minister Eknath Shinde on Holi shivsena Shakha