शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: "उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता"; इम्तियाज जलील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:32 IST

इम्तियाज जलील यांनी आधी उद्धव यांचे तोंडभरून कौतुक केले होते.

Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने जाता-जाता घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मागणीला मंजूरी दिली. कॅबिनेटमध्ये संभाजीनगर नावाला मंजुरी मिळताच शहरात शिवसैनिकांनी (Shiv Sena) जल्लोष केला. शहरातील विविध भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक व नागरिकांसह ढोलताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला. पण स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे नामकरण रुचलं नाही. तसेच एमआयएम नेत्यांनाही हे नामकरण पसंतीस पडलं नाही. याच मुद्द्यावरून AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या मावळत्या सरकारवर पुन्हा एकदा टीका केली.

औरंगाबादचे घाईघाईत नामकरण करण्याचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला, त्यावेळी त्या नामकरणामागे संभाजी महाराज यांच्याबाबतचे प्रेम नव्हते. स्वत:ची सत्तेची खुर्ची वाचवणे हे त्या निर्णयामागचे खरं कारण होतं. ठाकरे यांची सत्ता जात असताना कदाचित या नामकरणाने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचेल असा हा त्यांचा प्रयत्न होता. कोणत्याही जाती-धर्माचे लोक हे औरंगाबाद या नावाशी संबंध जोडत होते. कोणीही या शहराचे नाव बदलण्याची मागणी करत नव्हते. आतादेखील आम्ही आमच्या पद्धतीने लढा देऊ. आम्ही आंदोलनं करू, कोर्टाकडे दाद मागू आणि संसदेत देखील आवाज उठवू, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी विधान केले.

दरम्यान, या आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड झाले त्यावेळी ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांसमोर आले होते. त्यांनी शिंदे गटाला चर्चेला मुंबईत येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले होते. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणा मला खूपच भावला. आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण ऐकून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला. तुमच्या पक्षातील सर्व बंडखोरांना तुम्ही तुमच्या नम्रपणे चपराक लगावली आहेत", असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले होते.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन