कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 16:43 IST2022-07-06T16:34:25+5:302022-07-06T16:43:03+5:30

ज्यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे सोपविली त्यांनीच फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता.

Uddhav Thackeray did not know who betrayed him, not Eknath Shinde; Nitesh Rane took the name of 'niece' | कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना कळलेच नाही, 'तो' घरातच; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी दगा दिला. ज्यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे सोपविली त्यांनीच फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत कोणी दगा दिला हे कळलेलेच नाही, अशा शब्दांत गौप्यस्फोट केला. 

उद्धव ठाकरे म्हणतात, की मला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी दगा दिला. मी उद्धव ठाकरे यांना सांगेन की, दगा नेमका कोणी दिला. खऱ्या अर्थाने पहायचे असेल तर तुम्ही आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे. आपल्या अवतभोवती असलेले जे कधी निवडून न येणारे जे लोक आहेत त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने दगा दिला, हे उद्धव ठाकरेंना कळलेलेच नाहीय, असे राणे म्हणाले. 

सुरुवात करायची असेल तर ती आपल्या भाच्यापासून सुरू करा. त्याने अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी तुमची बदनामी केली. सत्तेचा गैरवापर केला. लोकांच्या घराबाहेर जाणं. लोकांच्या घराबाहेर धिंगाणा घालणे आणि भ्रष्टाचार करणे हे सारे तुमच्या भाच्याने केले आहे. हे सर्व तुम्हाला न कळल्याने आज तुमच्यावर ही वेळ आल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला. 
 

Web Title: Uddhav Thackeray did not know who betrayed him, not Eknath Shinde; Nitesh Rane took the name of 'niece'