शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

"...तर तुम्हाला महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का?", ठाकरेंचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 13:13 IST

Uddhav Thackeray on PM Modi : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर आता ठाकरेंनी मोदींना काही सवाल करत हल्ला चढवला.

Uddhav Thackeray PM Modi News : 'मोदीजी, तुम्ही कोणा-कोणाची माफी मागणार आहात. मग्रुरीने माफी मागून चालणार नाही', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेच्या निषधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारा आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. 

महाविकास आघाडीच्या 'जोडे मारा' आंदोलनाप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "चार दिवसांपूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का?", असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डागले. 

ठाकरे पुढे म्हणाले, "माफी मागताना सुद्धा त्यांच्या (मोदी) चेहऱ्यावरती जी एक मग्रुरी होती. मग्रुरी तुम्हाला (उपस्थित लोकांना) पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक, फक्त शब्दात नाही, पण मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही." 

एक शहाणा, दोन दीड शहाणे; शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर टीका

"त्याचवेळी जे काही त्यांच्या व्यासपीठावर बसले होते, त्यामध्ये एक शहाणा, दोन दीड शहाणे... मला कल्पना नाही. पण, त्यातील एक हाफ तर हसत होता. म्हणजे तुम्ही महाराजांची इतकी थट्टा करता. पहिले म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली?, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मागितली?", असे सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केले. 

"मोदीजी जेव्हा सिंधुदुर्गात आला, तेव्हा निवडणुकीसाठी आलात हे आम्हाला माहिती होते. आम्हाला अभिमान वाटला होता की, देशात पहिल्या प्रथम नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर साजरा होतोय. दिमाखदार केला होता. पण, त्याचवेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची गरज नव्हती", असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

कोणा-कोणाची माफी मागणार? मोदींना ठाकरेंचे सवाल

"निवडणुकीच्या वेळी जेव्हा मोदी म्हणत होते की, ही मोदींची गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी. जिथे हात लावेल तिथ सत्यानाश होईल. माफी तुम्ही कोणा कोणाची मागणार? महाजांचा पुतळा भ्रष्टाचाराने कोसळला त्यासाठी मागणार? निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभे केले, ते गळतेय म्हणून माफी मागणार? संसद भवन गळतेय म्हणून मागणार?", असे सवाल ठाकरेंनी मोदींना घेरले. 

"दिल्लीच्या विमानतळाचे छत कोसळले, पूल कोसळताहेत, सगळ्यांबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसे... राष्ट्रपती म्हणाल्या आता बस्स झाले. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा, महाराष्ट्र धर्माचा अपमान केला आहे. महाराष्ट्र शिवरायांचा अपमान करणाऱ्याला कधीही माफ करत नाही. करणार नाही", असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिला.

टॅग्स :MumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४