Uddhav Thackeray Interview: घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? उद्धव ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:50 AM2022-07-26T09:50:07+5:302022-07-26T09:56:55+5:30

Uddhav Thackeray Interview: आजही घराबाहेर पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

uddhav thackeray answer on why was he named among the top five chief ministers of the country even without leaving home | Uddhav Thackeray Interview: घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray Interview: घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? उद्धव ठाकरे म्हणाले...

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही पुन्हा एकदा पक्षाची मोट घट्ट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भाष्य केले. 

कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं… मी माझं नाव नाही म्हणत, पण जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा या सगळ्यांनी सहकार्य नसतं केलं तर मी कोण होतो? मी एकट्याने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर, पण फुटिरांचा आक्षेप त्याच्यावरच आहे. जे फुटून गेले आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की, आपण घराबाहेर पडला नाहीत. आपण मंत्रालयात गेला नाहीत. आपण त्यांना भेटला नाहीत, याबाबत विचारणा करण्यात आली. 

घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं?

एक मिनिट… घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? कारण त्यावेळेला ती परिस्थितीच तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि ते लोक ऐकत होते. मी जर का तेव्हा घराबाहेर पडलो असतो किंवा आजही पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच. म्हणजे मग काय झालं असतं की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, असं भाग्य फार क्वचित कोणाच्या नशिबी येतं. मला नाही वाटत ते यांच्या नशिबी आलं असेल, कारण यांना काही पदं आता मिळाली तरी अजूनही ‘हम तुम दोनो, एक कमरे मे बंद हो’ असे यांचे मंत्रिमंडळ आहे. त्याचा विस्तार कधी होणार आहे माहिती नाही. पण हे कितीही मंत्रीबिंत्री झाले तरी त्यांच्या कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का बसला आहे तो पुसता येणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आणखी वाचा: 

"हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक", उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स!

ती सडलेली पानं...; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'वर्षा'वरील दोन झाडांची गोष्ट, बंडखोरांना चपराक

काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल

Web Title: uddhav thackeray answer on why was he named among the top five chief ministers of the country even without leaving home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.